रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) निवडणुक निकालानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी राजीनामा दिला. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्ती संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बजरंग पुनियाने प्रतिष्ठित पद्म पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परत पाठवत असल्याचे जाहीर केले आहे त्याने ही माहिती ट्विट करून दिली.
भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी पंतप्रधान मोदींना एक लांबलचक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारतीय कुस्तीपटूंचा एक गट भारतीय कुस्ती महासंघातील ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मनमानी आणि हुकूमशाहीच्या विरोधात आंदोलन करत आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपचे खासदार आहेत आणि दीर्घकाळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. पैलवानांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे, तेही ब्रिजभूषण यांचे निकटवर्ती आहेत. अशा स्थितीत गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेले कुस्तीगीरांचे आंदोलन पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे. यामुळेच बजरंग पुनियाने आपले पदक परत करण्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा:
ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!
सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षात निकाली काढले ५२ हजार खटले!
अझरबैजानचे पाकप्रेम उफाळले; भारत-आर्मेनिया शस्त्र करारावर टीका
श्रीराममंदिरासाठी २१०० किलोची घंटा!
आंदोलन पूर्णपणे निरर्थक राहिल्यानंतर आणि केंद्र सरकारने महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याने भारताची ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि विनेश फोगट हिनेही काल कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते.