अर्मेनियाशी भारताने केलेल्या करारावरून शेजारी राष्ट्र अझरबैजानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. अझरबैजानचे भारतातील माजी राजदूत अश्रफ शिकालीव यांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे.अझरबैजानने काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी सहकार्याची भूमिका कायम ठेवली आहे, असे राजदूताने एका मुलाखतीत म्हटले आहे.
गेल्या ३० वर्षांत अझरबैजानची काश्मीरबाबतची भूमिका बदललेली नाही, ती अजिबात बदललेली नाही,” असे अझरबैजानचे राजदूत म्हणाले, जे नोव्हेंबरपर्यंत भारतात अझरबैजानचे राजदूत होते.भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा आदर करून हा प्रश्न शांततेने सोडवला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. गेल्या तीन दशकात यात कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.त्यावेळी अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, ‘मी हे निदर्शनास आणू इच्छितो की २१ जानेवारी २०२० रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या भेटीदरम्यान अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव म्हणाले की अझरबैजान जम्मू आणि पाकिस्तानला सतत पाठिंबा देईल.
हे ही वाचा:
“शरणागती पत्करा अथवा मरणाला सामोरे जा”, नेतन्याहूंचा हमासला इशारा!
आयकर विभागाकडून पॉलीकॅब इंडियाच्या ५० हून अधिक ठिकाणांवर छापे
काँग्रेस नेते सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा बँकेचा घोटाळा
अझरबैजानचे माजी राजदूत अश्रफ यांनी भारताकडून अर्मेनियाला होणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला असेही म्हणायचे आहे की भारत सरकारने आर्मेनियाला शस्त्रे विकण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.भारतीय शस्त्रे आर्मेनियातील बंडखोरांकडे पोहचत आहेत, जी आपल्या प्रदेशाच्या शांततेसाठी हानिकारक आहे.
आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये संघर्ष
अर्मेनिया आणि अझरबैजान अनेक दशकांपासून नागोर्नो-काराबाखवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत आहेत.२०२० मध्ये या प्रदेशावरील शत्रुत्वाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही देशांचे सैन्य रणांगणात उतरले. अझरबैजानने आर्मेनियावर लढाई जिंकली आणि २०२३ मध्ये नागोर्नो-काराबाख पूर्णपणे ताब्यात घेतला.
अर्मेनियाने भारतासोबत केलेल्या शस्त्रकरारानंतर अझरबैजान वैतागला
काही महिन्यांपूर्वी आर्मेनियाने भारत आणि फ्रान्ससोबत शस्त्रास्त्रांचा मोठा करार केला होता. या करारात हवाई संरक्षण यंत्रणा आणि चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे खरेदीचा समावेश आहे. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव या करारावर संतापले होते. आगीत इंधन भरण्यासाठी भारत आणि फ्रान्स एकत्र काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.ते म्हणाले होते, ‘भारत आणि फ्रान्ससारखे देश आर्मेनियाला शस्त्रे पुरवून आग आणखी भडकवत आहेत.हे देश अर्मेनियामध्ये असा भ्रम निर्माण करत आहेत की या शस्त्रांच्या मदतीने ते काराबाख परत घेऊ शकतात.