भारताच्या पुढील वर्षी २६ जानेवारी २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने शुक्रवारी दिली.या आधी भारत सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते , परंतु त्यांनी जानेवारीत नवी दिल्लीला भेट देण्यास असमर्थता व्यक्त केली.त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
२६ जानेवारी २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन हे सहावे फ्रेंच नेते असणार आहेत.फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक यांनी १९७६ आणि १९९८ मध्ये दोनदा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. माजी राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिस्कार्ड डी’एस्टिंग, निकोलस सार्कोझी आणि फ्रँकोइस ओलांद यांनी अनुक्रमे १९८०, २००८ आणि २०१६ मध्ये या सोहळ्याला हजेरी लावली होती.
पंतप्रधान मोदींनी जुलैमध्ये फ्रान्सला भेट दिल्यानंतर आणि पॅरिसमधील बॅस्टिल डे (फ्रेंच नॅशनल डे) समारंभात सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्यानंतर हा विकास झाला.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा!
जय श्रीराम म्हणत शबनम शेख निघाली अयोध्येला
प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू
विजय वडेट्टीवार म्हणतात, जितेंद्र आव्हाड भांबावलेत
सप्टेंबरमध्ये, मॅक्रॉन यांनी भारताने आयोजित केलेल्या G२० शिखर परिषदेसाठी दिल्लीला भेट दिली आणि पंतप्रधान मोदींशी चर्चा केली . बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, मॅक्रॉन यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली, भारत-फ्रान्स संबंध प्रगतीच्या नवीन उंचीवर पोहचतील याची खात्री करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे पंतप्रधान मोदी यांनी १० सप्टेंबर रोजी ट्विट केले होते.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे होते.भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परदेशी नेत्यांना आमंत्रित करतो.मात्र, कोविड-१९ महामारीमुळे २०२१ आणि २०२२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला परदेशी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.