दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सबएरियाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल विक्रांत नाईक यांनी नुकतीच कारुळकर प्रतिष्ठानला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मेजर जनरल विक्रांत नाईक यांनी प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांना खास सन्मानचिन्ह (Indian Army Momento of Excellence ) देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
प्रशांत कारुळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांनी त्यांचे स्वागत केले.
हे ही वाचा:
ड्रोन हल्ल्याच्या भीतीने १८ जानेवारीपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू!
सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं
आता आम्ही कोणतीही मशीद गमावणार नाही…
रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची चौकशी
कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयाला आतापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले आहे. कारुळकर प्रतिष्ठान ही सामाजिक कार्याला वाहिलेली संस्था आहे. विशेषतः आदिवासी पाड्यांत आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानचे कार्य सुरू आहे.
मे. जनरल विक्रांत नाईक यांच्या या भेटीबद्दल प्रशांत कारुळकर यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या वाटचालीत आणखी एका अविस्मरणीय प्रसंगाची नोंद झाल्याचे ते म्हणाले.