26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियातैवानवरून चीन आक्रमक; अमेरिकेला दिला इशारा

तैवानवरून चीन आक्रमक; अमेरिकेला दिला इशारा

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेत तैवान मुद्द्यावर चर्चा

Google News Follow

Related

तैवान प्रकरणावरून चीनने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला इशारा दिला आहे. तैवान हा चीनचाचं भूभाग आहे अशा आशयाचे वक्तव्य चीनकडून करण्यात आले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना तैवान प्रश्नावर इशारा दिला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बोलत होते. ‘एनबीसी’ या अमेरिकन वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.

सॅन फ्रान्सिस्कोच्या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत एका गटाच्या बैठकीत शी जिनपिंग यांनी जो बायडेन यांना इशारा दिला. येत्या काही दिवसांत तैवान मुख्य भूप्रदेश चीनशी जोडला जाईल, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलंय.

“तैवानला चीनमध्ये शांततेत समावेश करून घ्यायचं आहे. आम्हाला कोणतीही बळजबरी करायची नाही”, असं चीनने म्हटलं आहे. या शिखर परिषदेत हे दोन जागतिक नेते आमनेसामने आले होते. जो बायडेन यांच्या कार्यकाळातील ही त्यांची दुसरी भेट होती. इस्रायल-हमास युद्ध आणि तैवान हे दोन विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.

अमेरिकेने तैवानला नुकतीच लष्करी मदत देऊ केली आहे. यामुळे धोरण बदलत असल्याचे द्योतक मानले जात आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांतील बिघडलेले संबंध काहीसे सावरता येतात का, याचाही जिनपिंग यांचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

चीन २०२५ किंवा २०२७ पर्यंत तैवानवर कब्जा मिळवेल असं अमेरिकेने भाकित केलं होतं. त्यावरूनही चीनने अमेरिकेला सुनावलं आहे. अमेरिकेने जाहीर केलेली ही तारीख चुकीची असून तैवानवर कब्जा मिळवण्याबाबत अद्याप वेळ निश्चित झाली नसल्याचं जिनपिंग यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा:

स्थलांतर प्रश्नाच्या तोडग्यासाठी युरोपियन युनियनच्या ‘स्थलांतर धोरणा’त दुरुस्तीसाठी करार

माजी पंतप्रधान शरीफ यांना अपात्र ठरवणाऱ्या पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला

नवीन फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत मंजूर!

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला मेजर ध्यानचंद तर शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर!

गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापार-युद्ध सुरू आहे. एकमेकांच्या देशातून आयातबंदी किंवा आयात मालावर अतिरिक्त शुल्क लावणे, विकसनशील देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये स्पर्धा असे व्यापार- युद्धाचे स्वरूप आहे. मात्र, गेल्या वर्षी दोन्ही देशांचे संबंध अधिक चिघळले. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टी भागात चिनी बनावटीचे फुगे आकाशात दिसल्यानंतर हे फुगे हेरगिरीसाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप अमेरिकेने केला, तर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडलेले फुगे भरकटल्याचा दावा चीनने केला. अमेरिकेने थेट हवाई दलाच्या मदतीने हा फुगा फोडला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा