संसदेच्या प्रचंड सुरक्षा भंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकातील बागलकोट येथील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक यांचा मुलगा साई कृष्ण असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.तर दुसरा प्रदेशातील जालौनचा असून अतुल कुलश्रेष्ठ असे त्याचे नाव आहे.
१३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती.त्यांनतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी कर्नाटकातील बागलकोट येथून अटक केलेला साई कृष्ण हा मनोरंजन डीचा मित्र आहे.मनोरंजन डी याने १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या सभागृहात प्रवेश करून धुराच्या नळकांड्या फोडत घोषणाबाजी केली होती.या प्रकरणातील चार आरोपींपैकी मनोरंजन यांचा समावेश आहे.या चौघांना आता दहशतवादविरोधी कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा अंतर्गत आरोपांचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साई कृष्ण आणि मनोरंजन डी हे बेंगळुरूच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बॅचमेट होते.साई कृष्ण हा घरून काम करत होता.दिल्ली पोलिसांना माहिती मिळताच काल रात्री १० वाजता त्याच्या बागलकोट येथील घरातून ताब्यात घेतले असून चौकशीसाठी त्याला दिल्लीत आणले जात आहे.
हे ही वाचा:
माजी पंतप्रधान शरीफ यांना अपात्र ठरवणाऱ्या पाकिस्तानच्या माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला
रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय पुण्य पारेख यांची चौकशी
दोन खेळीत राहुल गांधी, ठाकरेंना शह आणि मात…
दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव अतुल कुलश्रेष्ठ असे असून तो उत्तर प्रदेशातील जालौनचा आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अतुल, ज्याला ‘बच्चा’ म्हणूनही ओळखले जाते, त्याचे पूर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाहीत आणि कोणताही राजकीय संबंध नाही परंतु तो विद्यार्थी जीवनापासूनच शहीद भगतसिंग यांच्या विचारसरणीबद्दल भावना उत्कट होता.
अटक करण्यात आलेला अतुल कुलश्रेष्ठ हा संसदेतील घुसखोरांशी फेसबुकवर चॅट करताना आढळून आल्याने त्याला चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी अटक केली.भगतसिंग फॅन्स क्लब असे या ग्रुपचे नाव होते, तर या ग्रुपच्या माध्यमातून सभांचे आयोजन करण्यात अतुल कुलश्रेष्ठ याचा हात होता.तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनातही तो सहभागी झाला होता.दरम्यान, अतुलच्या घरी मीडिया कर्मचारी पोहोचल्यावर कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अतुलला दोन मुले आणि एक मुलगी आहे.
दरम्यन, १३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.ज्यामध्ये मनोरंजन आणि सागर शर्मा,अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांचा समावेश आहे.तसेच ललित झा आणि महेश कुमावत याला देखील अटक करण्यात आली आहे.