32 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरक्राईमनामादारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला उडवले!

दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला उडवले!

पोलिसांकडून कार मालकाला अटक

Google News Follow

Related

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात दारू तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्रीच्या वेळेस ही घटना घडली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना नवकोठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.दारू तस्करांची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्यांनतर उपनिरीक्षक (एसआय) खमास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय पोलिस पथक दारू तस्करी रोखण्यासाठी रवाना झाले.छटौना गावातून अल्टो कारमधून काही पुरुष दारू तस्करी करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यांनतर पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली.

बुधवारी पहाटे १२.३० च्या सुमारास एक अल्टो कार पोलिसांच्या पथकाजवळ आली. एसआय चौधरी आणि त्यांच्या टीमच्या सदस्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला असता चौधरी आणि अन्य एका कॉन्स्टेबलला कारणे धडक दिली.कारच्या धडकेने एसआय चौधरी जमिनीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, जखमी कॉन्स्टेबलला टीमच्या इतर सदस्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

जगदीप धनखड यांना पंतप्रधानांचा फोन

उपराष्ट्रपतींची नक्कल करणं तृणमूल काँग्रेस खासदाराच्या अंगलट

निलंबित खासदारांना मतदानाचा हक्कही नाही; दैनंदिन भत्त्यापासूनही मुकावे लागणार!

ईव्हीएमविरोधातील अविश्वासाचा ठराव आणण्याच्या हालचाली निष्फळ!

या घटनेबद्दल बोलताना बेगुसरायचे पोलिस अधीक्षक (एसपी) योगेंद्र कुमार म्हणाले की, “एसआय खमास चौधरी यांनी दारूची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करताना आपला जीव दिला. एका अल्टो कारने त्यांना धडक दिली, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला”.

एसपी कुमार पुढे म्हणाले की, कारमध्ये उपस्थित असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या खाली एक टीम तयार करण्यात आली होती.पोलिसांनी कारवाई करत कार मालकाला अटक केल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा