राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करणं हे तृणमूल काँग्रेस खासदाराच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतींची नक्कल प्रकरण खासदार कल्याण बॅनर्जी यांना महागात पडण्याची शक्यता आहे. बॅनर्जी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका वकीलाने दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
संसदेतून आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण बॅनर्जी यांचा देखील समावेश आहे. बॅनर्जी यांनी संसदेच्या बाहेर अनेक खासदार उपस्थित असताना त्यांच्यासमोर उपराष्ट्रपतींची नक्कल केली गेली. यावेळी उपस्थित खासदार त्यांना दाद देत असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील तेथे होते आणि ते या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट करत होते.
हे प्रकरण दक्षिण जिल्हा पोलिसांच्या अंतर्गत येत नाही, त्यामुळे तक्रार नवी दिल्ली जिल्हा पोलीस ठाण्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. या घटनेनंतर जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही तरी मर्यादा असायला हवी. थोडी तरी लाज बाळगायला हवी होती. एक खासदार माझी नक्कल करतोय अन् दुसरा व्हिडिओ बनवतोय, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
शाहरुखची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस
काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!
यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं
राहुल गांधींचा पत्ता कट, ममता म्हणतात खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा!
संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला आणि राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांनी प्रस्तावानुसार खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन झालं आहे.