30 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेष८०० रेल्वे प्रवाशांची ४८ तासांनी सुटका

८०० रेल्वे प्रवाशांची ४८ तासांनी सुटका

Google News Follow

Related

तमिळनाडूत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवल्यामुळे सुमारे ८०० रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर अडकले होते. या सर्वांची तब्बल दोन दिवसांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

रविवार, १७ डिसेंबर रोजी सुमारे ८०० रेल्वे प्रवासी दक्षिण तमिळनाडूमधील थूथुकुडीजवळ श्रीवैकुंठम रेल्वे स्थानकाजवळ अडकले होते. येथे पूरपरिस्थिती उद्भवली होती. रेल्वे रुळांवरून पाणी वाहत असल्याने रेल्वे येथून नेणे सुरक्षित नसल्याने ती येथेच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढचे दोन दिवस बचाव पथकाने आव्हानात्मक हवामान परिस्थितीचा सामना करून या अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

अडकलेल्या सुमारे ८०९ प्रवाशांपैकी सोमवारी ३०० जणांची सुटका करण्यात आली असून त्यांची निवासाची व्यवस्था जवळच्या शाळेत करण्यात आली आहे. त्यानंतर हवामान अधिकच खराब झाल्यामुळे ही बचाव मोहीम थांबवावी लागली. तर, उरलेल्या ५०९ प्रवाशांची मंगळवारी सुटका करण्यात आली. जे प्रवासी रेल्वेतच अडकले होते, त्यांना अन्नपदार्थ आणि पाणी पुरवण्याची व्यवस्था राज्य पोलिस आणि स्थानिकांनी केली.

मदुराई विभागाचे रेल्वे कर्मचारी पहिल्यांथा श्रीवैकुंठम स्थानकावर पोहोचले. त्यानंतर थिरुनेल्वेलीमधून रेल्वे सुरक्षा दलाचे पथक निरीक्षक प्रवीण कुमार यांच्या निरीक्षणाखाली सोमवारी पाण्याच्या बाटल्या आणि अन्नपदार्थ घेऊन श्रीवैकुंठम स्थानकावर पोहोचले. ठिकठिकाणी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून ट्रक आणि जीपमधून त्यांनी मार्गक्रमणा केली.

काही ठिकाणी तर, छातीएवढ्या पाण्यातून तीन किमी चालत त्यांना अडकलेल्या प्रवाशांपर्यंत पोहोचावे लागले. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या तीन हेलिकॉप्टरमधून प्रवाशांना अन्नपदार्थांची पाकिटे आणि बाटल्या पुरवण्यात आल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही(एनडीआरएफ) घटनास्थळी पोहोचले. ते स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ३० तास प्रयत्न करत होते.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी रेल्वे सुरक्षा दल आणि तमिळनाडूच्या अग्नि व बचाव सेवेच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वे प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मंगळवार सकाळपर्यंत रेल्वे स्थानकातून सुमारे ५०९ रेल्वे प्रवाशांची सुटका झाली. अडकलेल्या प्रवाशांना तीन किमीचे अंतर गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून पायीच कापावे लागले. त्यानंतर त्यांना बसमध्ये बसवण्यात आले. या बसमधून त्यांना वांची मनियाच्ची स्थानकापर्यंत नेण्यात आले. तिथे रेल्वेच्या वैद्यकीय पथकाकडून त्यांना मदत पुरवण्यात आली.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे होऊ शकतात इंडी आघाडीचे मनमोहन

देशातील बेरोजगारीचा दर घटला

इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला दणका; याचिका फेटाळल्या

नायलॉन दोरखंडाच्या साह्याने प्रवाशांनी पाण्यातून मार्ग काढला. तर, ज्येष्ठ नागरिक किंवा अशक्त प्रवाशांना स्ट्रेचर्सच्या साह्याने नेण्यात आले. वांची मनियाच्ची स्थानकावरून विशेष रेल्वेने त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी चेन्नईला पाठवण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा