28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाअहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात,आठ जणांचा मृत्यू!

अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात,आठ जणांचा मृत्यू!

मृतांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा आणि ६ वर्षाच्या मुलीचा समावेश

Google News Follow

Related

अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक, टेम्पो आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा आणि ६ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तसेच पाच पुरुष एक महिलेचा समावेश आहे.

जुन्नत तालुक्यातील डिंगोरे येथे अंजीराची बागजवळ रविवारी रात्र ट्रक, टेम्पो, आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला. पिकअप गाडी भाजीपाला घेऊन ओतूरवरुन कल्याणकडे जात होती. तर रिक्षा आणि ट्रक ओतूरकडे येत होते.या दरम्यान हा विचित्र असा अपघात झाला.अपघातात गणेश मस्करे, कोमल मस्करे, हर्षद मस्करे, काव्या मस्करे, नरेश दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.तसेच रिक्षा चालक नरेश दिवटे याची ओळख पटली आहे. मात्र रिक्षातील इतर तीन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम ओतूर पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या ‘देशासाठी दान’ आवाहनावर इन्कलाब चित्रपटाच्या क्लिपने उत्तर!

रशियाचे व्लादिमिर पुतिन पुन्हा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत!

राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार तीन दिवस ठप्प!

अतिक अहमदचा सहकारी नफिस बिर्याणी मृत्युमुखी!

पिकअप रिक्षेमधील चार जण हे जुन्नर तालुक्यातील मढ पारगावचे रहिवाशी आहेत.अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्याच्या टीमने घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर मदत आणि बचावकार्य सुरु केले. पोलिसांना ग्रामस्थांनीही मदत केली. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा