23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषराज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार तीन दिवस ठप्प!

राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार तीन दिवस ठप्प!

विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामपंचायतीचे 'कामबंद आंदोलन'

Google News Follow

Related

राज्यभरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी व संगणक परिचालक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच,पंचायत समित्यांसमोर आंदोलन देखील केले जाणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील सुमारे २७ हजार ग्रामपंचायत आणि ६० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यअध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिली आहे.

या राज्यव्यापी संपात अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कामगार सेना या बरोबरच गावगाडा हाकणाऱ्या सर्वच संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तीन दिवस बंदनंतरही मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षा तिव्र लढा उभा करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्यअध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिली आहे. त्यामुळे या संपाचे ग्रामीण भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंनी अदानींचे विमान वापरले, पैसे नाही भरले!

विघ्नेश मुरकर युवा महोत्सव फोटोग्राफी स्पर्धेत पहिला

उत्तराखंडमधील पर्यटक आता हवेत उडणार!

सायबर फसवणूक प्रकरणी सरकारचे कडक धोरण, ५५ लाख सिम केले ब्लॉक!

काय आहेत प्रमुख मागण्या?
सरपंच, उपसरपंच थकीत मानधन अदा करावीत
मानधनात भरीव वाढ व्हावी
नानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी
विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन वेतन देण्यात यावे
निवृत्ती वेतन लागू करावे आणि उपदान लागू करावे
भविष्य निर्वाह निधी रक्कम इपीएफ कार्यालयात जमा करणे
यासह संगणक परिचालकांच्या मागण्यांसाठी राज्यातील सर्वच ग्रामपंचायती १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद पाळणार आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा