30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमुंबई खिलाडी संघाचे नेतृत्व अनिकेत पोटेकडे

मुंबई खिलाडी संघाचे नेतृत्व अनिकेत पोटेकडे

अल्टीमेट खो-खो सीझन २

Google News Follow

Related

मुंबई खिलाडी संघाने अल्टीमेट खो-खो सीझन २ साठी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याच्या नावाची घोषणा केली आहे. २४ डिसेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत ओडिशा येथे ही लीग खेळवली जाणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा २६ वर्षीय अष्टपैलू खेलाडू हा खो खो सर्किटमधील सर्वात चमकदार खेळाडूंपैकी एक आहे. सीझन १ मधील पोटेच्या कामगिरीमुळे त्याने अल्टीमेट खो खो ड्रीम टीममध्ये स्थान निश्चित केले आहे. अनिकेतच्या नावावर आठ सुवर्ण आणि पाच रौप्य पदके आहेत. तो मॅटवरील चपळ हालचालींसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई खिलाडी संघासाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून काम करेल.

कर्णधाराच्या निवडीबद्दल बोलताना, संघाचे मालक पुनित बालन म्हणाले, “अनिकेत पोटेची सीझन २साठी कर्णधार म्हणून निवड करणे ही एक धोरणात्मक निवड होती. पहिल्या आवृत्तीतील त्याची अपवादात्मक कामगिरी आणि त्याने मॅटवर ज्या पद्धतीने नेतृत्वगुण प्रदर्शित केले त्यामुळे त्याला या भूमिकेसाठी नैसर्गिक निवड झाली.

हे ही वाचा:

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या आणि घोटाळे केल्यामुळे त्यांना पक्षातून हाकलून दिलं!

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

मोदींनी सूरतला नवा पैलू पाडला; विश्वविक्रमी डायमंड बोर्सचे उद्घाटन!

श्रेयस तळपदेचे हृदय चक्क १० मिनिटे थांबले होते!

नवनियुक्त कर्णधार अनिकेतने आपल्या नवीन जबाबदारी बद्दल उत्साही असल्याचे सांगितले आणि संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले,* “माझ्यासाठी हा एक अनपेक्षित निर्णय होता, पण ही संधी मिळाल्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. व्यवस्थापनाच्या विश्वासाची परतफेड करण्यासाठी आणि मुंबई खिलाडी संघातील खेळाडूंना अधिक उंचीवर नेण्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. ”

मुंबई खिलाडी संघाने २७ वर्षीय बचावपटू महेश शिंदेची संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. महेश गेल्या मोसमातील सर्वोत्तम बचावपटूंपैकी एक होता. ज्याने त्याच्या नावावर १५.३३ मिनिटे बचाव केला होता.

बहुआयामी मुंबई खिलाडी सीझन २ मध्ये १३ अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. सीझन १ मधील पहिल्या पाच बचावपटूंमध्ये असलेल्या श्रीजेश एसच्या समावेशासह आगामी आवृत्तीत संघ मजबूत दिसत आहे. त्याने मॅटवर १७ मिनिटे ३५ सेकंदांचा बचाव वेळ दिला आहे. त्यांनी १६ वर्षीय सुनील पात्रासोबत सीझन एकचा विजेता अष्टपैलू खेळाडू सुभाषिस संत्रा यालाही संघात घेतले आहे.

प्रशिक्षक विकास सूर्यवंशी यांच्या देखरेखीखाली संघ सध्या बिजू पटनायक इनडोअर स्टेडियम, KIIT कॅम्पस, भुवनेश्वर, ओडिशा येथे प्रशिक्षण घेत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा