यूकेमधील लॉफबरो युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेला भारतीय विद्यार्थी जीएस भाटिया हा १५ डिसेंबरपासून पूर्व लंडनमध्ये बेपत्ता असल्याची माहिती आहे.बेपत्ता असलेल्या तरुण जीएस भाटिया याच्या शोधासाठी भाजप नेत्याने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची मदत मागितली आहे.
भाजपचे प्रमुख नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विटर वर पोस्ट करून तरुण जीएस भाटिया बेपत्ता असल्याची माहिती दिली आणि याच्या शोधासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे मागणी केली.भाजपचे प्रमुख नेते मनजिंदर सिंग सिरसायांच्या पोस्टनुसार, भारतीय विद्यार्थी जीएस भाटिया हायूकेमधील लॉफबरो युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे.१५ डिसेंबर पासून तो बेपत्ता आहे. भाटिया यांना शेवटचे १५ डिसेंबर रोजी कॅनरी वार्फमध्ये पाहिले गेले होते त्याचा अद्याप ठावठिकाणा लागला नसल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
हे ही वाचा:
संसद सुरक्षाभंग प्रकरणातील सर्व आरोपींच्या फोनचे सुटे भाग राजस्थानमधून हस्तगत!
माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर!
बिहारमध्ये डॉक्टरांची दारू पार्टी!
पाकिस्तान महिलांसाठी सुरक्षित नाही
मनजिंदर सिंग सिरसा यांनी बेपत्ता असलेला जीएस भाटिया या विद्यार्थ्याचे कॉलेज ओळखपत्र आणि निवास परवाना देखील पोस्ट केला. भाजप नेत्याने दोन संपर्क क्रमांक पोस्ट मध्ये दिले आहेत.तसेच बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याची बातमी शेअर करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप या प्रकरणी माहिती आलेली नाही.