22 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषलेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

Google News Follow

Related

भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे यांना लेहमध्ये बचावकार्यादरम्यान वीरमरण आले. शिंदे हे मूळचे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरचे होते. सुनील शिंदेंवर बदलापूरच्या मांजर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सुनील शिंदे हे भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागात व्हेहीकल मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. सध्या लेह परिसरात त्यांची पोस्टिंग होती. जानेवारी महिन्याअखेरीस लेह परिसरात हिमस्खलन झाले होते. यावेळी बचावकार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली होती. या बचावकार्यादरम्यान सुनील शिंदे यांच्यासह अन्य काही जवान बेपत्ता झाले होते.

पण बर्फाखाली गाडले गेल्यानं त्यांचा शोध लागू शकला नव्हता. अखेर हिमवृष्टी थांबल्यानंतर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शिंदे आणि इतर जवान हे मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर भारतीय सैन्याने शिंदे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले

लॉकडाऊनवरून ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले

तात्काळ पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा

ठाकरे सरकारने जे काही झोल झपाटे केलेत ते सांगून टाका

यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शहीद सुनील शिंदे यांचे पार्थिव बदलापूरच्या घरी आणण्यात आलं. त्यांचे कुटुंबिय आणि परिसरातील लोकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर रात्री ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी एक सैन्य अधिकारी आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. मात्र एका वीर जवानाला ज्या पद्धतीनं शासकीय इतमामात मानवंदना दिली जाते, त्यानुसार शिंदे यांना मानवंदना दिली गेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुनील शिंदे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा