पुष्पा द राईज फेम अभिनेता अल्लू अर्जुनने दारू आणि पान मसाला ब्रँडचा जाहिरात करार नाकारला आहे. सुमारे १० कोटी रुपयांची ऑफर त्याने नाकारली आहे. तो म्हणाला मी स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही त्यामुळे माझ्या चाहत्यांनी तंबाखूचे सेवेन करावे यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करणार नाही असे अल्लू अर्जुनने म्हटले आहे.
यंदा एप्रिलमध्ये केजीएफ फेम सुपरस्टार यशने तंबाखू ब्रँडची डील नाकारली होती. त्याच्या चाहत्यांना योग्य संदेश द्यायचा असल्याने त्यानेही कोट्यवधी रुपयांचा करार नाकारला होता. एका बाजूला दाक्षिणात्य अभिनेते तंबाखू ब्रँडचे करार नाकारत असताना दुसरीकडे बॉलीवूडचे दिग्गज अजय देवगण, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी गुटखा ब्रँडच्या जाहिरात केली. या तिघांना अलीकडेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (CCPA) तंबाखूच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा..
३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन
संसद हल्लाप्रकरणी महेश कुमावतला दिल्ली पोलिसांकडून अटक
रा. स्व. संघाचे नेते श्रीनिवास यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य
लोअर परळ येथील सहकारी पतपेढीच्या अध्यक्षासह १५ जणांविरुद्ध गुन्हा
शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत अभिनेता अक्षय कुमार विमल ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसला होता. यावरून वाद निर्माण झाला आणि अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांकडून टीका झाल्यानंतर गेल्या वर्षी विमलच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी, त्यांनी कंपनीच्या इलायची उत्पादनांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सही केली होती. मात्र विमल कंपनी तंबाखू उत्पादन करत आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारने विमल पान मासाल्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून परत येत असल्याचा दावा करणाऱ्या एका मीडिया रिपोर्टचे खंडन केले आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पान मसाला जाहिरातीमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा सहभाग होता त्यावेळीसुद्धा त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार टीका झाल्यानंतर बच्चन यांनी या जाहिरातीमधून माघार घेतली होती.