24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामारा. स्व. संघाचे नेते श्रीनिवास यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य

रा. स्व. संघाचे नेते श्रीनिवास यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य

पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी

Google News Follow

Related

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेतील दहशतवाद्यांच्या भरतीप्रकरणी चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने १६ एप्रिल २०२२ रोजी केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी अनेक आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस काढली आहे. आरोपींमध्ये एर्नाकुलमचे अब्दुल वहाब, मुहम्मद याजेर अराफात, पलक्कड जिल्ह्याचे अब्दुल रशिद, अयुब टीए, मुहम्मद मंजूर, शाहुल हमीद आणि मुहम्मद अली केपी आणि मलप्पुरम जिल्ह्याचा सफीक पीके यांचा समावेश आहे.

एनआयएने सोशल मीडियावर आरोपींशी संबंधित काही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. तपास संस्थेने श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीचे छायाचित्रही जाहीर केले आहे.

 

दुकानाजवळ केली होती हत्या

रा. स्व. संघाचे नेते श्रीनिवासन यांची हत्या त्यांच्या दुकानाजवळ झाली होती. श्रीनिवासन त्यांचे दुचाकीचे दुकान चालवत होते. त्यांच्या दुकानावर आलेल्या पाच जणांनी त्यांची हत्या करून पलायन केले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा प्रसंग कैद झाला होता. तेव्हाही आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी या हत्येमागे पीएफआयचा संबंध असल्याचा आरोप केला होता.

हे ही वाचा:

रतन टाटा यांना धमकी देणारा स्किझोफ्रेनिया’चा रुग्ण

मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच सर्वाधिक विरोध केला

‘राज्य मासा’ असलेल्या पापलेट माशासाठी शासनाचे पाऊल

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला

दोन डझन जणांना अटक

केरळ पोलिसांनी श्रीनिवासन यांची हत्या आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली दोन डझनहून अधिक जणांना अटक केली होती. १५ एप्रिल रोजी पीएफआय नेता सुबैर याची हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी श्रीनिवासन यांची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या हत्येतील सहभागी मारेकरी एकमेकांसाठी अनोळखीच राहतील, याचा विचार करूनच कट आखण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा