30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणमराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच सर्वाधिक विरोध केला

मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच सर्वाधिक विरोध केला

मंडल आयोगाला विरोध करणारे आता तोंड वर करून बोलतात देवेंद्र फडणवीस यांचा पवार ठाकरे यांच्यावर घणाघात

Google News Follow

Related

लोकांना झुंजवत ठेवायचे. त्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत हा शरद पवार यांचा इतिहास आहे. मराठा समाजाला सर्वाधिक विरोध हा शरद पवार यांनीच केला असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मंडल आयोगाला विरोध केला आणि आज तोंड वर करून आरक्षणासाठी बोलतात. महाविकास आघाडीच्या काळातच खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षण सोडून महाराष्ट्रात दुसरे कुठले प्रश्न नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते त्यांना फक्त लोकांना झुंजवत ठेवायचे होते असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला. नागपूरच्या कोराडी येथे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांना वारंवार संधी मिळाली होती. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यांच्या मनातच मराठ्यांना आरक्षण द्यायच नव्हत त्यामुळे त्यांनी ते दिले नाही. इतके निवाडे झाले त्याआधी कोण कुठल्या यादीत आहेत हे साध कोण विचारात देखील नव्हते. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकवून दाखवले. मात्र आमचे सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती मिळाली. आमचे वाचन पक्के आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहे. हे करत असताना ओबीसी समाजावर कोठेही अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजावर कुठले संकट येऊ देणार नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जातीच्या विषयातून भेद होणार नाही याकडे गांभीर्याने बघावे. आपण सर्व समाजघाटक एकमेकांवर अवलंबून आहोत. मागासलेपण दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक वीण कुठे उचकटू नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा..

मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर, दीपक चहरची वनडेतून माघार

‘देशासाठी दान द्या’ म्हणत काँग्रेसकडून जनतेकडे पैशांची मागणी

रतन टाटा यांना धमकी देणारा स्किझोफ्रेनिया’चा रुग्ण

हरयाणा करणार इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांची भरती

फडणवीस म्हणाले, राज्यात जी विकसित भारत यात्रा निघणार आहे, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. सरकारच्या योजना त्याचे लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. देशाची सूत्र पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच हातात द्यायचे हे लोकांनी पक्के ठरवले आहे. त्यामुळे हि यात्रा सामान्य माणसाला नरेंद्र मोदी यांच्याशी जोडणारी यात्रा आहे. आपले नेतृत्व हीच आपली संपत्ती आहे. विरोधी इंडी आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही. मोदी हटाव हा एकमेव अजेंडा आहे. कारण त्यांची दुकाने बंद होणार आहेत. त्याला कुलूप लागू नये यासाठी हा सर्व प्रकार सुरु आहे. मात्र लोकांनीच आता ठरवले आहे कि देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवायचे आहे. तीन राज्यात आलेल्या निकालातून हे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी सात प्रकारच्या ग्यारंटी दिल्या होत्या पण लोकांनी त्या नाकारल्या. केवळ आणो केवळ मोदी ग्यारंटी लोकांनी स्वीकारली आहे. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी विजयाच्या भावनेतून कामाला लागावे. आपले राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपण तीन पक्ष एकत्र येऊनच लढणार आहे. कोणाला किती जागा याची चिंता करू नका. तीन राज्याच्या निकालाने आपले मनोबल वाढले आहे. तसे विरोधकांचे खचले आहे. त्यांना देशाची चिंता नाही पण सत्तेच्या राजकारणात आपले अस्तित्व कसे टिकवता येईल यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस प्रयत्न करत असल्याची टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा