मध्य प्रदेशमधील लाडली बहन योजनेने महिला सक्षमीकरणात मोठे योगदान दिले आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबन, आरोग्य, पोषण आहारात सुधारणा, कुटुंब मजबूत करण्यासाठी या योजनेचा लाभ होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्थिक विभागाच्या विशेष शोध अहवालात हे नमूद केले आहे.
या योजनेमुळे महिला निर्णय घेण्यासाठी सक्षम होत आहेत. त्याचे परिणाम या निवडणुकीतही दिसले. भाजप महिला मतदारांसह नाते जोडण्यात यशस्वी ठरला. चार दुर्बळ महिलांपैकी तिघींनी भाजपला मत दिले. राज्यातील सुमारे सव्वा कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. राज्य सरकारने आतापर्यंत दोन हजार ४१८ कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यात वळवले आहेत. येत्या काही महिन्यांत ही रक्कम दरमहा एक हजार २५० कोटी रुपयांवरून तीन हजार कोटींपर्यंत पोहोचेल.
हे ही वाचा:
संसदेतील सुरक्षाभंगावरून विरोधी पक्षांचे राजकारण!
OLX वर जुना बेड विकायला गेला अन ६८ लाखांचा बसला फटका!
अबब! स्विगीकडून त्याने वर्षभरात मागवले ४२ लाखांचे पदार्थ!
गडचिरोलीत सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार!
राज्याच्या सीमेपार योजनेचा लाभ
अहवालानुसार, किमान एक टक्के लाभार्थी दुसऱ्या राज्यांत पैसे खर्च करत आहेत. कामासाठी ज्या महिला विविध राज्यांत गेल्या आहेत, त्या तिथे खर्च करत आहेत. अशाप्रकारे ही योजना बिहार, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचली आहे.
योजनेचा व्यापक परिणाम
या योजनेतून मिळणाऱ्या निधीचा वापर महिला मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी करत आहेत.
८७ टक्के खात्यांमध्ये सरासरी सात हजार रुपये तर, १३ टक्के खात्यांमध्ये सात हजार ५००हून अधिक रक्कम आढळली आहे.
केवळ महिलांवर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्यात आणि पोषण परिस्थितीत सुधारणा झाली आहे.
या योजनेमुळे महिला आपल्या प्राथमिकतेनुसार, खर्च करण्यासाठी पहिल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र झाली आहे.
कौटुंबिकस्तरावर निर्णय घेतानाही महिला अधिक प्रभावीपणे त्यांची भूमिका मांडत आहेत.