संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी सहाव्या आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव ललित झा असे आहे. या ललितने त्याची सहकारी-पश्चिम बंगालस्थित स्वयंसेवी संस्थेची संचालक नीलाक्षा यांना हल्ल्यानंतर लगेचच त्याचा व्हिडीओ पाठवल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपीने बुधवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास हा व्हिडीओ पाठवला होता. ललित झा सध्या फरार आहे.
‘ललितने मला फोन केला नाही, परंतु त्याने मला संसदेबाहेर आंदोलकांनी केलेली घोषणाबाजी आणि धुराच्या नळकांड्या फोडत असतानाचा व्हॉट्सअपवर व्हिडीओ पाठवला होता. तेव्हा मी कॉलेजला होते. मी माझा फोन नंतर पाहिला. त्यानंतर मी त्याला या आंदोलनाबाबत अधिक माहिती विचारली,’ असे या महिलेने सांगितले. या हल्ल्याचा सूत्रधार ललिता झा असल्याचे सांगितले जात आहे. तो स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवतो. त्याचे अनेक विशेषतः बंगालमधील स्वयंसेवी संस्थांशी संबंध असल्याचे मानले जात आहे. बंगालमधील पुरुलिया आणि झारग्राम जिल्ह्यांत तो सक्रिय असल्याचे सहकाऱ्यांना सांगितले होते.
हे ही वाचा:
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय
‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’
काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत
‘आमची पहिली भेट कोलकात्यातील एका कार्यक्रमात झाली होती. तेव्हा त्याने स्वतःची ओळख सामाजिक कार्यकर्ता म्हणून करून दिली होती. तसेच, तो मागासवर्गीयांसाठी सामाजिक कार्य करण्यास उत्सुक असल्याचे त्याने सांगितले होते,’ अशी माहिती नीलाक्षा ऐच यांनी दिली. ललित हा ऐच यांच्या स्वयंबादी सुभाष सभा या स्वयंसेवी संस्थेचा सरचिटणीस म्हणून काम करतो.