26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरसंपादकीयपडघ्यात ‘काँग्रेसच्या मुहब्बत की दुकान’ची ब्रांच...

पडघ्यात ‘काँग्रेसच्या मुहब्बत की दुकान’ची ब्रांच…

पडघा -बोरिवली हे गाव इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचे मुख्य ठिकाण

Google News Follow

Related

आरएसएसकडून या देशात द्वेष पसरवला जातोय, आम्ही मात्र देशात मुहब्बत की दुकान खोलून बसलोय, हे विधान काँग्रेस नेते वारंवार करतात. असेच एक मुहब्बत की दुकान चालवणारा फरहान मुहम्मद सुसे एनआयएच्या जाळ्यात सापडला आहे. पडघा-बोरीवली गावावर छापा टाकून एनआयएने हमासचे महाराष्ट्र मॉड्यूल उद्ध्वस्त केले. तिथे अटक केलेल्या १५ खतरनाक दहशतवाद्यांमध्ये फरहान सुसेचा समावेश आहे. हा बोरिवली गावचा उपसरपंच असून ठाणे जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक मोर्चाचा पदाधिकारी आहे.

अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणि त्यांच्या तैनाती फौजांनी दहशतवाद्यांच्या आरत्या ओवाळल्या हा इतिहास आहे. संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्ष झाली. या हल्ल्याचा मास्टर माईंड अफजल गुरू याचा काँग्रेसला प्रचंड पुळका होता. दिग्विजय सिंह हा वरिष्ठ काँग्रेस नेता फरार दहशतवादी झाकीर नाईक याच्यासोबत एका मंचावर बसला आहे. ओसामा बिन लादेनचा उल्लेख याच माणसाने ओसामाजी असा केला होता. बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर अश्रू ढाळणाऱ्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना खूष करण्यासाठी असे चाळे काँग्रेसने वारंवार केले.

दहशतवादी इशरत जहाँच्या आरत्या ओवाळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचा डीएनए एकच आहे. त्यामुळे हमासच्या दहशतवादी कारवायाप्रकरणी अटक करण्यात आलेला फरहान सुसे हा काँग्रेसचा पदाधिकारी निघाला तर कोणाला फारसे आश्चर्य वाटणार नाही. अलिकडे आमचे हिंदुत्व कसे वेगळे आहे असे सांगत, शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांच्या मांडीवर बसले आहेत. फरहान सुसे सारख्या लोकांना जो पक्ष पोसतो, त्यांच्या सोबत ठाकरेंचा दोस्ताना त्यांचे हिंदुत्व किती वेगळे झाले आहे हे स्पष्ट करणारा आहे.

 

इस्लामिक स्टेट अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय असणाऱ्या पडघा-बोरिवली येथे शनिवारी एनआयएकडून सिक्रेट ऑपरेशन राबविण्यात आले. पडघा बोरिवलीत ज्यावेळी कारवाई झाली त्याच वेळी एनआयएने पुणे कोंढवा, मिरारोड, ठाणे अशा एकूण ४४ ठिकाणीही कारवाई केली. परंतु सर्वात मोठे ऑपरेशन पडघा-बोरिवली येथे राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान एनआयएने पडघा-बोरिवली गावातून इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख नेता साकीब नाचन याच्यासह १५ जणांना अटक करून त्यांना दिल्ली येथे नेण्यात आले आहे. सुसेचा या पंधरा जणांमध्ये समावेश आहे.

 

पडघा-बोरिवली येथे शुक्रवारी मध्यरात्री पडघा- बोरिवली गावाला जवळपास ५०० पोलिसांचा वेढा टाकण्यात आला. पहाटे तीनच्या सुमारास एनआयए आणि राज्य एटीएसच्या पोलिसांची जवळपास ७० ते ७५ वाहने पडघा- बोरिवली गावात शिरली. आता इतका मोठा ताफा कशाला? एनआयएची टीम युद्धावर चालली होती का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.
२००३ मध्ये पडघ्यात अशीच कारवाई झाली होती तेव्हा स्थानिक लोकांनी केलेल्या जबरदस्त दगडफेकीमुळे क्राईम ब्रँचच्या टीमला परत फिरावे लागले होते. काही पोलिस या दगडफेकीत जखमी झाले होते. दया नायक, प्रदीप शर्मा असे नामांकीत अधिकारी या कारवाईत सहभागी होती.

त्यामुळे एनआयएने यावेळी कोणतीही कसर ठेवली नाही. स्थानिक पोलिसांच्या मदतीने साकीब नाचन याच्या घरासह जवळपास ३५ अड्ड्यांवर वेळी धाडसत्र सुरू केले. एनआयए कडून राबविण्यात आलेले ऑपरेशन पडघा- बोरिवली हे पहाटे ३ वाजता सुरू झाले आणि सकाळी ८ वाजता संपले. अटक करण्यात आलेल्या १५ दहशतवादयांपैकी काही जणांकडे हमास देशाचे ध्वज (झेंडे), एक पिस्तुल, दोन एअर गन, आठ तलवारी सह दोन लॅपटॉप, ६ हार्डडिक्स,तीन सीडी,३८ मोबाईल फोन, १० मॅगजीन बुक्स, ६८लाख ३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पडघा -बोरिवली हे गाव इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचे मुख्य ठिकाण बनले होते. या ठिकाणी शरिया कायद्याचे पालन केले जात होते. या टोळक्याने भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी सुरू केली होती. पडघा गावाचे नामकरण ‘अल शाम’ अर्थात ‘मुक्त क्षेत्र’ असे करण्यात आले होते. हा तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना पडघा येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते. साकीब नाचन हा मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली होती.

२००२-०३ च्या मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या १३ दहशतवाद्यांमध्ये पडघ्यातील पाच रहिवाशांचा समावेश होता. त्यावेळी पडघा गाव हे देशाच्या नकाशावर आले होते. २०१७मध्ये साकीब हा तुरुंगातून बाहेर आला होता.साकिब नाचन हा सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान मधील इसिसच्या तीन बड्या हँडलर्स च्या थेट संपर्कात होता, सीरियातून अबू सुलतान ,इराक मधून मोहम्मद उर्फ भाई आणि अफगाणिस्तानमधून अबू सुलेमान या तिघांच्या संपर्कात होता.

हे ही वाचा:

जमिनीतून खजिना बाहेर काढण्याच्या बहाण्याने ११ जणांची हत्या करण्याऱ्या ‘सीरिअल किलरला’ अटक!

संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे झाली; त्याचदिवशी संसदेत शिरले दोन घुसखोर

कलम ३७०वरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भारतात दुफळी निर्माण करणाऱ्यांचा पराजय

आयपीएलच्या टायटलमधून ‘टाटा’ला टाटा; बीसीसीआयकडून टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर जारी

या टोळक्याला अटक झाल्यानंतर विधानसभेत अबू आझमी यांनी गळा काढला. कोणतीही पूर्वसूचना न देता एनआयएने पहाटेच्या वेळ कारवाई केल्याचे अजब तर्कट त्यांनी मांडले.भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी फरहान सुसे या दहशतवाद्याचा काँग्रेसशी संबंध होता, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. भातखळकर यांच्या गौप्यस्फोटानंतर सुसेचे राजकीय गॉडफादर कोण हे यानिमित्ताने उघड होणार आहे.

 

आर्थिक रसद आणि राजकीय आश्रयाअभावी दहशतवादी कारवाया फोफवत नाहीत. काँग्रेसचा पदाधिकारी असलेला एक तरुण हमासमध्ये सामील होऊन भारताच्या विरोधात उठाव करण्याचे कारस्थान करतो. साकीब नाचनसोबत उभा राहतो ही धोक्याची घंटा आहे. काँग्रेस नेत्यांनी याप्रकरणी खुलासा करण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा