23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेष‘तुमच्याकडे किती खलिस्तानी राहतात?’

‘तुमच्याकडे किती खलिस्तानी राहतात?’

हत्येचा कट रचण्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेला भारताचा सवाल

Google News Follow

Related

अमेरिकेत खलिस्तानी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचण्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर भारताने चौकशीची घोषणा केली आहे. खलिस्तानीप्रश्नी कॅनडाने भारतावर आरोप केले असतानाच, अमेरिकेनेही खलिस्तानी पन्नू याला मारण्याचा कट रचला जात असून त्यामागे एका भारतीय व्यक्तीचा हात असल्याचा दावा केला होता. आता भारतीय तपास संस्थांनी अमेरिकेकडे तेथे राहात असलेल्या खलिस्तानी समर्थकांची माहिती मागितली आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या शीख फुटीरतावादी चळवळीतील कार्यकर्त्यांची माहिती अमेरिकेने द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय तपास संस्थेने अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांच्याकडे एका बैठकीत केली आहे. अमेरिकेतून भारताविरोधात कट रचणारे खलिस्तानी समर्थक आणि अंतर्गत सुरक्षेसंदर्भात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. फुटीरतावादी चळवळीशी संबंधित असणाऱ्या संशयितांची माहिती भारताला दिली जावी, अशी मागणीही यावेळी भारतातर्फे करण्यात आली.

हे ही वाचा:

मुलीला वाचवण्यासाठी केरळमधील महिलेला येमेन जाण्यास परवानगी!

एअर इंडियाच्या केबिन क्रूसाठी नवा गणवेश जाहीर

महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड

अमेरिकी तपास संस्थेने या कटासंदर्भातील माहिती दिल्यानंतर भारताने उच्चस्तरीय चौकशीची स्थापना केली आहे. भारतीय नागरिक निखिल गुप्ता हा पन्नू याच्या हत्येचा कट रचत होता. हा निखिल गुप्ता कोणा भारतीय अधिकाऱ्याच्या संपर्कात होता, असा दावाही अमेरिकेने केला आहे. यानंतर बायडेन सरकारेही आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचे जाहीर केले होते. तर, भारतानेही आपण या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करत असल्याचे सांगितले होते. ‘या हत्येमागे एका भारतीय व्यक्तीचा संबंध दिसून आला म्हणजे त्यात भारताचा सहभाग आहे, असे सिद्ध होत नाही. भारतातील अनेकजण परदेशात राहतात आणि त्यातील कोणीही अशा प्रकारचा कट रचू शकतात. यात भारत सरकारचा काहीही संबंध नाही,’ असे ठाम प्रतिपादन भारत सरकारतर्फे करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा