28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषआजोबांच्या वाढदिवशी आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न!

आजोबांच्या वाढदिवशी आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न!

विधानसभेवर संघर्ष यात्रा धडकली, पोलिसांकडून लाठीमार

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळ इमारतीवर धडक मारण्याचा प्रयत्न केला. आपले आजोबा आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवशी आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी रोहित पवारांनी संघर्ष यात्रेचा समारोपही केला. विधिमंडळावर धडक देण्याचा प्रयत्न करताना आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.रोहित पवारांसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात ८०० किमीचा प्रवास करुन आज नागपुरात दाखल झाली. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत ४०० गावांमधून ही युवा संघर्ष यात्रा केली. त्यांच्या या यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला. नागपुरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण केलं. त्यानंतर रोहित पवार यांची ही युवा संघर्ष यात्रा थेट विधान भवनाच्या दिशेला निघाली.

हे ही वाचा:

शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!

भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!

कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट

काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल

राष्ट्रवादीचे इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते विधान भवनच्या दिशेला येत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला. पोलिसांनी बॅरिकेट्स लावत कार्यकर्त्यांना अडवलं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटीलही सहभागी झाले. पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलं. तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा