28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणकॉलेजमधील विद्यार्थी नेता ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

कॉलेजमधील विद्यार्थी नेता ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

भाजपच्या मोहन यादव यांची राजकीय कारकीर्द

Google News Follow

Related

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सोमवारी भोपाळमध्ये झालेल्या भाजपच्या विधीमंडळ बैठकीत मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची निवड करून राजकीय विश्लेषकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनाही धक्का दिला. नवनिर्वाचित आमदारांच्या या बैठकीच्या ठिकाणाबाहेर जमलेल्या भाजपच्या समर्थकांनीही या नावाची अपेक्षा केली नव्हती.

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून तीनवेळा आमदार झालेले ५८ वर्षीय मोहन यादव हे शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे शिक्षण विभागाचा कार्यभार होता. उज्जैन लोकसभा मतदारसंघातील मालवा उत्तर भागात येणारा उज्जैन दक्षिण मतदारसंघ सन २००३पासून भाजपचा गड मानला जातो.

मोहन यादव यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सन २०१३मध्ये झाली. या वेळी ते उज्जैन दक्षिण मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. सन २०१८च्या विधानसभा निवडणुकीतही ते याच मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. २ जुलै, २०२० रोजी शिवराजसिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्यानंतर यादव यांचा मध्य प्रदेशात राजकीय प्रभाव वाढला.

२५ मार्च, १९६५रोजी उज्जैन येथे जन्मलेलेल्या यादव यांचे भाजपशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. एक राजकीय व्यक्तिमत्त्व आणि उद्योगपती असलेले यादव यांनी कॉलेजमध्ये विद्यार्थी नेता म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

हे ही वाचा :

३० तासांत आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या!

मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांच्या ऑडिटसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करणार

आयपीएल २०२४च्या लिलावासाठी ३३३ खेळाडू सज्ज

मुंबईतील व्यापाऱ्याला घरात ओलीस ठेवून ५५ लाखांचा ऐवज केला लंपास!

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यादव यांनी काँग्रेसच्या चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२ हजार ९४१ मतांनी पराभव केला आणि स्वतःचा उज्जैन दक्षिण मतदारसंघ कायम ठेवला. ९५ हजार ६९९ मते मिळवून ते तिसऱ्यांदा आमदार झाले. मोहन यादव यांनी उज्जैन विद्यापीठातून डॉक्टरकीची पदवी मिळवली असून त्यांनी कायद्यात पदवीही मिळवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा