सायन रुग्णालयाच्या अपघात कक्षाच्या शौचालयात नुकत्याच जन्मलेल्या बाळाला फेकणारी कुवारी मातेला सायन पोलिसांनी अटक केली आहे. फेकण्यात आलेले मृत अर्भक हे स्त्री जातीचे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या मातेविरुद्ध सायन पोलिसांनी अर्भकाचा परित्याग करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायन येथील मुंबई महानगर पालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयाच्या अपघात कक्ष येथील महिला शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात सफाई कर्मचारी महिलेला एका पिशवीत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले होते. कर्मचारी महिलेने तात्काळ डॉक्टरांना कळवून त्या अर्भकाला तपासणी साठी आणले असता, पूर्णपणे वाढ झालेल्या या अर्भकाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर या घटनेची माहिती सायन पोलिसांना देण्यात आली.
हेही वाचा :
मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांच्या ऑडिटसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करणार
आयपीएल २०२४च्या लिलावासाठी ३३३ खेळाडू सज्ज
मुंबईतील व्यापाऱ्याला घरात ओलीस ठेवून ५५ लाखांचा ऐवज केला लंपास!
हातमिळवणी काँग्रेससोबत अपेक्षा मोदींकडून
सायन पोलिसांनी मृत अर्भकाच्या पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची यादी तयार करून तपास सुरू केला.दरम्याम सीसीटीव्ही फुटेज वरून एक महिला संशयास्पदरित्या आढळून आली. पोलिसानी या महिलेचा शोध घेतला असता सदर महिला ही धारावी परिसरात राहणारी असल्याचे समोर आले.
पोलीस पथकाने २३ वर्षीय मुस्लिम महिलेला धारावीतून ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ते अर्भक तिनेच टाकल्याची कबुली तीने पोलिसांना दिली.२३ वर्षीय महिला ही अविवाहित असून प्रेमसबंधातून ती गर्भवती राहिली,त्यानंतर प्रियकराने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तीने गर्भात पूर्ण वाढ झालेल्या अर्भकाचा त्याग करण्याचे ठरविले.
शुक्रवारी ती रुग्णालयात तपासायला आली असता तीने शौचालयातच बाळाला जन्म दिला , आणि ते स्त्री जातीचे मूल तीने पिशवीत टाकून कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिले होते अशी माहिती समोर आली.या प्रकरणी सायन पोलिसानी तीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.