तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पाय घसरीन पडल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.के चंद्रशेखर राव हे एररावल्ली येथील त्यांच्या फार्महाऊसवर घसरून पडल्याने त्यांना हैदराबादच्या यशोदा रुग्णालयात नेण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी के चंद्रशेखर राव याना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
केसीआर यांची मुलगी कविता कलवकुंतला यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी ट्विट करून सांगितले की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या रुग्णालयात तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. पाठिंबा आणि शुभेच्छांमुळे वडील लवकरच बरे होतील. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर आपल्या एररावल्ली येथील फार्महाऊसवर पक्षांच्या नेत्यांची आणि लोकांची भेट घेत होते.याच फार्महाऊसवर केसीआर पाय घसरून पडले आणि त्यांना दुखापत झाली.केसीआर यांची मुलगी कविता कलवकुंतला यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निर्देशानुसार, इतर मंत्र्यांनी यशोदा रुग्णालयात केसीआर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
हे ही वाचा:
डेन्मार्कने कुराण बाबत उचलले महत्वाचे पाऊल!
झारखंड काँग्रेस खासदाराच्या घरात सापडले १०० कोटी रोख!
काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती
फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दखल घेत के चंद्रशेखर राव याना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हणाले की, “तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री श्री केसीआर गरू यांना दुखापत झाल्याचे जाणून दुःख झाले. मी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधानांनी लिहिले.
दरम्यान, तेलंगणात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसला हॅट्ट्रिकची आशा होती, पण काँग्रेसने त्यांचा पराभव केला.११९ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसने ६४ जागा जिंकल्या तर बीआरएसला ३९ जागा मिळाल्या.गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ए रेवंत रेड्डी यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.