23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाराज्य सरकारने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार

राज्य सरकारने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जोरदार दणका दिला. पद गमवावे लागल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीत धडकले आणि महाराष्ट्र शासनाने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे ठरवले.

Google News Follow

Related

मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश सीबीआयला दिले. अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे ठरवले. त्यानुसार आज सरकारकडून या निर्णयावर याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर ₹१०० कोटी खंडणी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचे आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्याबरोबरच एक याचिका देखील त्यांनी न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमुर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जी एस कुलकर्णी यांच्यासमोर चाललेल्या सुनावणीत न्यायालयाने  या प्रकरणात सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा:

आम्ही हिंदूनो एक व्हा, म्हटलं असतं तर…

अमित शाह, योगी आदित्यनाथ लष्कर-ए-तोयबाच्या हिट लिस्टवर

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय?

न्यायालयाच्या या आदेशानंतर अनिल देशमुखांनी राजिनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आणि ते दिल्लीला रवाना झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआयला हस्तक्षेप करू देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याबरोबरच या चौकशीत दोषी आढळल्यास एफआयआर दाखल करण्याचे देखील आदेश दिले. पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारत आहे असे सांगत अनिल देशमुख यांनी राजिनामा दिला. सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु संघवी हे राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत.

अनिल देशमुखांनी राजिनामा दिल्यानंतर दिलीप वळसे- पाटील यांच्या खांद्यावर गृहमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. तर त्यांच्याकडील कामगार कल्याण खात्याचा अतिरिक्त भार हसन मुश्रीफ यांच्याकडे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त भार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा