चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गांग यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या किंवा छळ करून त्यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ‘पोलिटिको’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, जुलै महिन्याच्या अखेरीस बीजिंगच्या सैनिकी रुग्णालयात किन गांग यांचा मृत्यू झाला. याच रुग्णालयात चीनच्या महत्त्वाच्या व्यक्तींवर उपचार केले जातात.
किन गांग यांना जुलै २०२३ मध्ये मंत्री पदावरून दूर करण्यात आले होते. किन गांग यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार देण्याआधी त्यांनी जुलै २०२१ पासून ते जानेवारी २०२३ पर्यंत अमेरिकेतील चीनचे राजदूत म्हणून काम केले होते. अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून काम करत असताना त्यांचे एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले, ज्यातून महिलेला एक मुलगा झाला होता. तसेच त्यांच्यावर हेरगिरी केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. हकालपट्टी झाल्यानंतर अनेक दिवस ते बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता ते मृत पावले असल्याची नवी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या वॉल स्ट्रिट जर्नल वर्तमानपत्रात १९ सप्टेंबर रोजी एक लेख छापून आला होता. या विवाहबाह्य संबंधामुळे किंवा इतर कारणांमुळे किन गांग यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तर केली नाही ना? याचा तपास केला जात असून किन गांग तपासात सहकार्य करत आहेत, असेही या लेखात म्हटले होते. किन गांग यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार देण्याआधी त्यांनी जुलै २०२१ पासून ते जानेवारी २०२३ पर्यंत अमेरिकेतील चीनचे राजदूत म्हणून काम केले होते. वॉशिंग्टनमध्ये चीनचे सर्वोच्च दूत म्हणून काम करत असताना किन गांग यांनी एका महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवले, ज्यामुळे संबंधित महिलेला अमेरिकेत एक मुलगा झाला, असे या लेखात नमूद करण्यात आले होते.
हे ही वाचा:
१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर
स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!
तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता
लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!
किन गांग यांच्या संबंधीची बातमी जुलै महिन्यात बाहेर आल्यानंतर कम्युनिस्ट पक्षानेही अंतर्गत समिती स्थापन करून गांग यांची चौकशी सुरू केली होती. किन गांग यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्याजागी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी वांग यी यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.