32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामा१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मदरशांच्या आर्थिक स्रोतांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत १०० कोटी रुपये मिळालेल्या ८० मदरशांचा शोध घेतला आहे. या मदरशांना गेल्या दोन वर्षांत अनेक देशांकडून देणग्या मिळाल्या. मदरशांनी हा निधी कोणत्या शीर्षकाखाली खर्च केला आणि त्यात काही अनियमितता आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न एसआयटी करत आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर प्रदेशात सुमारे २४ हजार मदरसे आहेत. त्यापैकी १६ हजार ५०० हून अधिक मदरशांना शिक्षण मंडळाची मान्यता आहे. ‘परकीय निधीतून मिळालेला पैसा कसा खर्च झाला, त्याची तपासणी केली जाईल. हा पैसा मदरसा चालवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरला जात आहे का, हे तपासले जाईल,’ असे एसआयटीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मोहित अग्रवाल यांनी सांगितले. राज्य सरकारने अद्याप चौकशी पूर्ण करण्यासाठी कोणतीही मुदत दिली नसल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. एसआयटीने यापूर्वीच त्यांच्या बोर्डाकडून नोंदणीकृत मदरशांचे तपशील मागवले आहेत.

योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या वर्षी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मदरशांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. दोन महिन्यांच्या सर्वेक्षणादरम्यान, राज्य मदरसा शिक्षण मंडळाची मान्यता नसलेले आठ हजार ४४९ मदरसे कार्यरत असल्याचे आढळून आले. लखीमपूर खेरी, पिलीभीत, श्रावस्ती, सिद्धार्थनगर आणि नेपाळ सीमेला लागून असलेल्या बहराइच व्यतिरिक्त, एक हजारांहून हून अधिक मदरसे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत या भागात मदरशांची संख्या झपाट्याने वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय या मदरशांना परदेशी निधी मिळत असल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली. अल्पसंख्याक विभागाच्या तपासात अनेक मदरशांना परदेशी निधी मिळत असल्याचेही समोर आले आहे.

हे ही वाचा:

स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!

तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता

लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार

अलीकडेच एटीएसने बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांच्या बेकायदा प्रवेशात सहभागी असलेल्या टोळीतील तीन सक्रिय सदस्यांना अटक केली आहे. दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तीन वर्षांत २० कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचे तपासात उघड झाले असून, त्याचा वापर त्यांना मदत करण्यासाठी केला जात होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा