25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषभाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे

भाजपा देशवासियांचे हृदय जिंकणारे अनव्रत अभियान आहे

भारतीय जनता पार्टीच्या ४१व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे विचार, कार्यप्रणाली याबाबत थोडक्यात मत व्यक्त केले. त्याबरोबरच त्यांनी भाजपाच्या विजयामागची कारणे, भाजपाचे सरकार स्थापन होण्याचा अर्थ देखील सांगितला.

Google News Follow

Related

आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४१ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार प्रकट केले.

त्यांनी भाषणामध्ये शामा प्रसाद मुर्खर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, राजमाता सिंदिया श्रद्धांजली वाहिली. त्याबरोबरच जनसंघापासून ते भाजपापर्यंत राष्ट्र यज्ञात योगदान देणाऱ्यांना नमन केले आणि भाजपाच्या विस्तारासाठी कार्यरत असलेल्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “सेवा आणि समर्पणाने पार्टी कसे काम करते-सामान्य कार्यकर्ताच्या तप आणि त्यागाने पार्टी कुठुन कुठे पोहोचू शकते याचे उदाहरण आहे. एखाद्याच ठिकाणी पार्टीसाठी दोन-दोन पिढ्या झटल्या नसतील.

शामा प्रसाद मुखर्जींपासून व्यक्तीपेक्षा पार्टी आणी पार्टीपेक्षा देश मोठा ही आमची परंपरा आहे. त्यामुळे अटलजींनी एका मताने सरकार पडू दिले परंतु लोकशाही मुल्यांशी तडजोड केली नाही.

या भाषणात मोदींनी भाजपा सरकारने केलेल्या विविध कामांबद्दल सांगितले. भाजपा सरकारने विविध मार्गाने अंत्योदयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यातूनच वंदे भारत ते गरीब कल्याण सारख्या विविध योजना उभ्या राहिल्या.

हे ही वाचा:

सचिन वाझेचा पुन्हा एकदा सीएसएमटी- कळवा प्रवास

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विना परीक्षा पास करणार?

आम्ही हिंदूनो एक व्हा, म्हटलं असतं तर…

“त्याबरोबरच आत्मनिर्भर भारत हे प्रत्येकाचे अभियान झाले आहे.”  असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी केलेली विविध कामे सांगितली. भाजपाचे कार्यकर्ते कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो, त्यामुळे राजकारणात आल्यावर अधिक जोमाने काम करतो असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. त्याबरोबरच भाजपा निवडणुक जिंकणारे मशीन नाही तर देशवायिसांचे हृदय जिंकणारे सतत अनव्रत अभियान आहे.

“भाजपाचे अनेक कार्यकर्ते जमिनीवर काम करतात. यांच्यामुळेच भाजपा मजबूत आहे. माध्यमे, पेपर इत्यादी ठिकाणी दिसणारे लोक मोजके आहेत.” असेही त्यांनी सांगितले

“भाजपा जिंकणे म्हणजे राष्ट्र प्रथम, देशहिताशी नसलेली तडजोड, देशाची सुरक्षा प्रथम, घराणेशाहीपासून मुक्तता, उत्तम नियमन, विकास, अनेकता में एकताचे प्रतिक आहे” असे त्यांनी सांगितले. या कार्यात बलिदान दिलेल्या कित्येक कार्यकर्त्यांबद्दल देखील त्यांनी आदर प्रदर्शित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा