मुंबईमधील दादर येथील भरतक्षेत्र या साडीच्या दुकानावर बुधवार, ६ डिसेंबर रोजी ईडीने टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडीनंतर भरतक्षेत्र दुकानात तब्बल १२ ते १३ तास चौकशी केल्याची माहिती आहे. शिवाय याप्रकरणी १५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते.
मुंबईच्या दादरमध्ये भरतक्षेत्र हे प्रसिद्ध साडीचे दुकान आहे. भरतक्षेत्र दुकान आणि दुकानाचे मालक मनसुखलाल गाला यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. छाप्यात तब्बल १५ लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ईडीने भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला यांचे चार्टर्ड अकाउंटंट आणि इतरांच्या एकूण पाच ठिकाणांवर छापे टाकले होते. तब्बल १२ तास हे सर्च ऑपरेशन सुरू होते. २०१९ साली बांधकाम व्यवसायिक अरविंद शहा यांच्या तक्रारीवर दाखल झालेल्या फसवणूक आणि फॉर्जरीच्या प्रकरणात हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते.
बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत शहा आणि गाला हे दोघे भागीदार असून गाला यांनी बेकायदेशीररित्या शहांच्या कुटुंबाचे कंपनीतील ५० टक्के भाग २५ टक्क्यावर आणल्याचा शहांचा आरोप आहे. ज्यामुळे त्यांना तब्बल १३३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी तपास करत आहे. भरतक्षेत्रचे मालक मनसुखलाल गाला यांच्यावर २०१९ साली आर्थिक घोटाळ्यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता.
हे ही वाचा:
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; नऊ विधेयकं मांडणार
दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?
पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!
रेवंथ रेड्डींकडे येणार तेलंगणच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने भरतक्षेत्र साडी व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दस्तावेज आणि कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. अद्याप या प्रकरणी ईडीकडून किंवा भरतक्षेत्र आणि त्यांचे मालक मनसुखलाल गाला यांच्यकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.