युनेस्कोने गुजरातच्या गरब्याला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली असून त्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा घोषित केले आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विट करून युनेस्कोच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. यामध्ये जी किशन रेड्डी यांनी लिहिले आहे की, भारताचे अभिनंदन! गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी रेड्डी यांच्या या ट्विटचा हवाला देत आनंद व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवसांचा गरबा आयोजित केला जातो. यामध्ये हजारो लोक एकत्र येऊन आई अंबेच्या पूजेचा उत्सव साजरा करतात.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लिहिले की, ‘गुजरातचा गरबा’ युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (ICH) यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा देशाचा १५ वा वारसा आहे. रेड्डी यांनी लिहिले आहे की, गरबा हे उत्सव, भक्ती आणि सामाजिक समतेचे मोठे प्रतीक आहे, परंपरेचे प्रतीक आहे.
हे ही वाचा:
पाकव्याप्त कश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एक जागा राखीव
निफ्टीची जाहिरात चक्क कोरिया रेल्वे स्टेशनवर झळकली आणि…
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत रवी बिश्नोई अव्वल
पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!
युनेस्कोने गरबाला अमूर्त वारसा म्हणून घोषित केल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की,”गरबाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश हा गुजरात आणि भारतासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीला जगाने दिलेला हा सन्मान आहे.”
दरम्यान, युनेस्कोच्या या निर्णयावर गरबा आयोजकांनीही आनंद व्यक्त केला आहे. वडोदरा येथे दरवर्षी वडोदरा नवरात्रोत्सवाचे आयोजन करणारे सत्येन कुलाबकर यांनी ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगून गरबाला आज हा मान मिळाला ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. कुलाबकर म्हणाले की, गरबा गुजरातची संस्कृती व्यक्त करतो. गरबा कार्यक्रमात अंबे मातेची पूजा केली जाते. या घटनांमध्ये आई जगदंबेचा प्रत्यक्ष वास असतो. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत येथे प्रचंड गरब्याचे आयोजन केले जाते. वडोदरा हे सर्वात मोठ्या गरबा कार्यक्रमांचे केंद्र आहे.