32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणपाकव्याप्त कश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एक जागा राखीव

पाकव्याप्त कश्मीरमधील विस्थापितांसाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एक जागा राखीव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा

Google News Follow

Related

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून बुधवार, ६ डिसेंबर रोजी लोकसभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली. पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे.

लोकसभेत ‘जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक’ आणि ‘जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक’ या दोन विधेयकांवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. “जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर काय झाले? असा प्रश्न जे लोक विचारत होते. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, मागच्या ७० वर्षांत ज्यांचा आवाज आजवर ऐकला गेला नाही. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन ५ आणि ६ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटविले. त्यानंतर आज आम्ही जम्मू-काश्मीरमधील विस्थापित नागरिकांना त्यांचे अधिकार देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत आज “जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक” आणि “जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक” या दोन विधेयकांमुळे त्या सर्वांना न्याय दिला जाणार आहे”, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी विस्थापितांची संख्या देखील सांगितली. पाकव्याप्त काश्मीरधून ४६ हजार ६३१ कुटुंबे आणि १ लाख ५७ हजार ९६८ लोक विस्थापित झाले. हे विधेयक त्या लोकांना अधिकार प्रतिनिधित्व देण्याची हमी असणार आहे. काश्मीरमध्ये तीन युद्धे झाली. या युद्धांमुळे हजारो लोकांना आपले स्वतःचे घर दार सोडून जावे लागेल. याशिवाय १९६५ आणि १९७१ साली देखील पाकिस्ताविरोधात युद्ध झाले. तीनही युद्धात जम्मू आणि काश्मीरमध्ये ४१ हजार ८४४ लोक विस्थापित झाले.

हे ही वाचा 

आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत रवी बिश्नोई अव्वल

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ ​​धाडीला अटक!

ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी

उद्धव ठाकरे आणखी किती रडारड करणार?

“जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेतील जागांचेही पुनर्गठन करण्यात आले आहे. जम्मूत आधी ३७ जागा होत्या, त्या वाढवून आता ४३ करण्यात आल्या आहेत. तर काश्मीरमधील ४६ जागा वाढवून ४७ करण्यात आल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधून २४ जागा राखीव ठेवल्या आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पूर्वी १०७ जागा होत्या त्या वाढवून ११४ झाल्या आहेत. आधी दोन सदस्य नामनिर्देशित केले जात होते, आता पाच सदस्यांना नामनिर्देशित करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा