पंजाब पोलिसांनी मंगळवारी अमृतसरमधून खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या एका साथीदाराला अटक केल्याचा दावा केला आहे.भारतातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांपैकी एक आणि जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा पुतण्या रोडे याचा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रोडेचा सहकारी परमजीत सिंग उर्फ धाडी हा दहशतवादी कारवायांना आणि इतर बेकायदेशीर कामांना आर्थिक मदत करण्यात गुंतल्याचे पोलिसांनी सांगितले.त्याच्या अटकेनंतर चौकशीत अनेक खुलासे होऊ शकतात.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी ट्विट करत याची माहिती दिली.ते म्हणाले की, एसएसओसी (स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल) अमृतसरने ब्रिटनस्थित परमजीत सिंग उर्फ धाडीला अमृतसर विमानतळावरून अटक करून मोठे यश मिळाले.गौरव यादव म्हणाले की, “प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISYF (इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन) चा प्रमुख लखबीर रोडे याचा सहकारी धाडी पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया आणि इतर विध्वंसक कारवायांना वित्तपुरवठा करण्यात गुंतलेला आहे.”दहशतवादी नेटवर्क उघड करण्यासाठी तपास सुरु आहे, असे अधिकारी म्हणाले.
हे ही वाचा:
अचीव्हर्सला नमवून ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी विजेती
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या
आणखी एक खलिस्तानी दहशतवादी यमसदनास; लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू!
‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!
परमजीतच्या अटकेमुळे परिसरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलला मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले.रोडे यांचे पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खलिस्तानी फुटीरतावादी चळवळीमागे ७२ वर्षीय रोडे याची कल्पना होती.भिंद्रनवालेच्या मृत्यूनंतर तो पाकिस्तानात पळून गेला आणि लाहोरमध्ये स्थायिक झाला.सोमवारी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.दहशतवादी रोडे हा ‘इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन’चे नेता होता.