24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामा२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर तुरुंगात विषप्रयोग

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर तुरुंगात विषप्रयोग

पाकिस्तानातील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर उपचार सुरू

Google News Follow

Related

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील २६/११ चा भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अद्याप कोणीही विसरलेलं नसताना याबाबतीत एक नवी अपडेट समोर आली आहे. २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीरवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

साजिद मीर याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल जेलमध्ये त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचे बोलले जात आहे. मीरला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने एअरलिफ्ट केले असून सध्या तो सीएमएच बहावलपूरमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने त्याचे भारताकडे होणारे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी विषप्रयोगाचं नाटक रचल्याचा भारतीय यंत्रणांना संशय आहे.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यान साजिद मीर हा मुंबईतील दहशतवाद्यांशी संपर्कात होता. तो अजमल कसाब आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानातून आदेश देत होता. साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबाचा फॉरेन रिक्रूटर होता तसेच अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचादेखील मुख्य हॅंडलर होता. साजिद मीरला काही महिन्यांपूर्वीच लाहोर सेंट्रल जेलमधून दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी १५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

साजिद मीरवर अमेरिकच्या एफबीआयने ५ कोटी डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे. टेरर फायनान्सिंग प्रकरणी मीरला आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील एका तुरुंगात अज्ञात व्यक्तीने साजिद मीरवर विष प्रयोग केल्याचा दावा केला जात आहे. मात्र भारताच्या या मोस्ट वाँटेड दहशतवादाशी संबंधित या बातमीत किती तथ्य आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही. परदेशी भूमीवर भारताच्या शत्रूंचा एकापाठोपाठ खात्मा होत असताना ही बाब समोर आली आहे.

कोण आहे साजिद मीर?

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर मीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. साजिद मीरने हाफिज सईदसह दहशतवादी हल्ल्याची पद्धती तयार केली होती. मुंबई हल्ल्यात १६६ हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

२०११ मध्ये अमेरिकन कोर्टात त्याला दोषी ठरवल्यानंतर त्याच्यावर पाच दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अमेरिकेने त्याला दहशतवाद्यांना भौतिक मदत पुरवणे, अमेरिकन नागरिकांची हत्या, सार्वजनिक वापराच्या ठिकाणी बॉम्बफेक करणे यासाठी दोषी ठरवले.

हे ही वाचा:

भाजपला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांद्वारे ७२० कोटी मिळाले!

शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वर्षभरात ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त

द. आफ्रिकेच्या संघाची घोषणा; टेंबा बावुमाला कर्णधारपदावरून हटवले

२०२३ च्या सुरुवातीला चीनने मीरला जागतिक दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला होता. या काळात भारताने चीनवर जोरदार टीका केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव प्रकाश गुप्ता म्हणाले, “जर आपण संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्याला अटक करू शकत नसलो, तर दहशतवादाविरुद्ध प्रामाणिकपणे लढण्याची खरी राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा हा पुरावा आहे.” ते म्हणाले, कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सर्व सदस्य देशांची संमती आवश्यक असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा