झोमॅटो या फूड डिलिव्हरी ॲपवरून मागविलेल्या चिकन बिर्याणीच्या पॅकेटमध्ये एक मृत सरडा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हैदराबादमधील एका कुटुंबाने स्थानिक रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीच्या पॅकेटमध्ये मृत सरडा सापडल्याने कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे.अशा घटनांमुळे पुन्हा एकदा आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
हैदराबाद आरटीसी क्रॉस रोडजवळील बावर्ची हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.डीडी कॉलनी, अंबरपेट येथील विश्व आदित्य या युवकाने चिकन बिर्याणीची ऑनलाइन ऑर्डर दिली होती.
हे ही वाचा:
महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!
माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!
केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?
काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीवर अखिलेश सिंह यांचा वरचष्मा?
तेलगू स्क्राइबच्या पोस्टनुसार, कुटुंबाने सांगितले की, झोमॅटो डिलिव्हरी करणार्या व्यक्तीने केवळ चिकन बिर्याणीच आणली नाही तर एक अनपेक्षित पाहून घेऊन आला, तो म्हणजे एक मृत सरडा.या घटनेने आमच्या कुटुंबाला एकच धक्का बसला आणि कुटुंबाने निराशा व्यक्त केली, असे पोस्ट मध्ये म्हटले आहे.ही ऑर्डर बावर्ची हॉटेलमधून मागवण्यात आली होती.हॉटेल व्यवस्थाकाकडून करण्यात आलेला दुर्लक्षपणा त्याने पोस्ट मध्ये कॅप्शनसह अधोरेखित केला.
झोमॅटो केअरने या पोस्टला उत्तर देताना सांगितले की, ही समस्या अत्यंत गंभीर असून आम्ही ती ओळखली आहे. तसेच या संबधी ग्राहकांशी बोललो आहोत.आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेऊ आणि पुन्हा अशा चुका होणार नाही याची काळजी घेऊ.मात्र, अशा घटनांमुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्याचा विषय उंबरठ्यावर आला आहे.