इंडोनेशियातील मेरापी पर्वतावर रविवारी झालेल्या उद्रेकात अकरा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून १२ जण बेपत्ता आहेत, स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अल जझीराने सोमवारी वृत्त दिले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पश्चिम सुमात्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा जवळपास ७५ लोक या परिसरात उपस्थित होते.
पडांग शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख अब्दुल मलिक म्हणाले, “आम्हाला १४ जण सापडले आहेत, त्यापैकी ३ जिवंत आणि ११ मृत आहेत तर १२ जण अजून बेपत्ता या आहेत.शनिवारी सुमारे ७५ गिर्यारोहकांनी २,९०० मीटर उंच पर्वतावर चढाई सुरू केली होती आणि ते अडकले आहेत.पडांग येथील स्थानिक शोध आणि बचाव एजन्सीचे अधिकारी हॅरी ऑगस्टियन यांनी सांगितले की, त्यापैकी आठ जणांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीवर अखिलेश सिंह यांचा वरचष्मा?
सिलक्यारा बोगद्याचे काम याच महिन्यात होणार सुरू!
भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विक्रम रचला!
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या ठिकाणाजवळील डोंगरावर चढण्याचे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत.तसेच खबरदारी म्हणून ज्वालामुखीच्या मुखापासून ३ किलोमीटरपर्यंत उतारावर असलेली गावे रिकामी करण्यात आली आहेत.स्फोटानंतर ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्घटनेतून वाचविण्यात आलेल्या नागरिकांमध्ये अशक्तपणा आणि त्यांच्या अंगावर जळण्याच्या जखमा दिसल्या. बचाव पथकांनी जखमी झालेल्या नागरिकांना डोंगरावरून खाली नेले.या घटनेचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहेत, ज्यामध्ये रुग्णवाहिकेमध्ये गिर्यारोहकांना नेले जात आहे.काही गिर्यारोहक जखमी तर भाजलेल्या स्वरूपात आहेत.तसेच बचाव कर्मचारी देखील मदत करताना दिसत आहे.