26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषहवाई दलाला मिळाल्या १५३ अग्निवीरवायू महिला

हवाई दलाला मिळाल्या १५३ अग्निवीरवायू महिला

गैरअधिकारी कॅडरमध्ये पहिल्यांदाच सहभाग

Google News Follow

Related

भारतीय हवाई दलाने शनिवारी पहिल्यांदा स्वतःच्या गैरअधिकारी कॅडरमध्ये महिलांना सहभागी करून घेतले आहे. या १५३ अग्निवीरवायू महिलांनी कर्नाटकमधील बेळगावात असलेल्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. २२ आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या सर्व महिला पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती प्रवक्ते विंग कमांडर आशीष मोघे यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी नौदलाने अग्निपथ भर्ती योजनेंतर्गत मार्च २०२३मध्ये पहिल्यांदा अधिकारी रँकच्या खाली (पीबीओआर) कॅडरमध्ये महिलांना सहभागी करण्यास सुरुवात केली होती. या अंतर्गत भर्ती होणाऱ्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाते. पासिंग आऊटचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. याच दिवशी पहिल्यांदा अग्निवीरवायू महिलांच्या पहिल्या गटाने त्यांच्या समकक्ष पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून परेडमध्ये सहभाग घेतला. ही पुरुषांच्या अग्निवीरांची पहिली बॅच होती.

भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे हवाई अधिकारी कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल आर. राधीशने परेडचे निरीक्षण केले. सद्यस्थितीत बीपीओआर कॅडरमध्ये महिलांना केवळ सैन्य पोलिस कोअरमध्ये सहभागी केले जाते. मात्र अग्निपथ योजेनंतर्गत लवकरच या महिलांसाठी आणखी वेगळे मार्ग खुले होऊ शकतात. तीन सुरक्षा दलांमध्ये सैनिकांना अल्प कालावधीसाठी सहभागी करण्याची ही योजनेमुळे दशकानुरूप चालत आलेल्या योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. जुनी योजना गेल्या वर्षी सरकारने बंद केली होती.

हे ही वाचा:

अमित शहा म्हणाले, ‘अवघ्या पाच मिनिटांत कारागृह व्यवस्थापन मंत्र्याचा कैदी झालो’

मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान गुन्हेगाराची नाकाबंदी!

गिरगावमधील चारमजली इमारतीला आग; दोन ठार!

मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!

१४ जून, २०२२ रोजी संरक्षण मंत्रालयाने लष्करभरतीच्या जुन्या पद्धतीत बदल केला. अधिकाधिक तरुणांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम करण्याचा हेतू यामागे आहे. अग्निपथ योजनेंतर्गत केवळ चार वर्षांसाठी सैनिकांची भरती होते. अर्थात कठोर परीक्षणानंतर यातील २५ टक्के सैनिकांना पुढच्या १५ वर्षांसाठी नियमित करण्याचेही या योजनेत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करणाऱ्यांना एअर मार्शलतर्फे गौरवण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा