‘पाच मिनिटांपूर्वी मी कारागृह व्यवस्थापन मंत्री होतो आणि पुढच्या पाच मिनिटांत मी कैदी झालो होतो…’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सन २०१० मध्ये सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केल्यावर त्यांना झालेल्या तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची आठवण करून दिली. शाह यांनी बोलताना ‘त्या’ कठीण प्रसंगांची आठवण काढल्यामुळे समोर बसलेले श्रोतेही आश्चर्यचकीत झाले.
जुनागढमधील प्रख्यात वकील आणि माजी कायदा व न्याय मंत्री दिव्यकांत नानावटी यांची जन्मशताब्दीनिमित्त रुपायतन ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना, शाह यांनी नानावटी यांचे पुत्र निरुपम यांच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले. ते प्रसिद्ध फौजदारी वकीलही आहेत. त्यांचे काँग्रेसशी प्रदीर्घकाळापासून राजकीय संबंध असूनही त्यांनी शाह यांची केस लढवली होती.
हे ही वाचा:
मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान गुन्हेगाराची नाकाबंदी!
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची चुपी; स्पष्टीकरण टाळले
माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक
आरिफ बनला वीर… हिंदू मुलीवर बलात्कार, धर्मांतर, गर्भपात
“काँग्रेसने मला फसवले आणि सीबीआयने गुन्हा दाखल केला, तेव्हा मी आणि माझे मित्र कोणाला वकील म्हणून नेमायचे याचा विचार करत होतो. त्यावेळी साहजिकच निरुपमभाईंचे नाव पुढे आले. परंतु त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची असल्याने ते खटला चालवतील की नाही, याबद्दल माझ्यासह सर्वांनाच शंका होती. पण मला वाटलं, ‘त्याला विचारण्यात काय नुकसान आहे?. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी लगेचच होकार दिला. त्यांनी केवळ माझी केसच घेतली नाही तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि मला मुक्तता मिळवून देण्यात मदत केली,’ अशी आठवण शाह यांनी काढली.
शाह यांना डिसेंबर २०१४ मध्ये मुक्त करण्यात आले. “जेव्हा मी त्यांना (निरुपम) याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचे काँग्रेसमध्ये मित्र आहेत आणि त्यांनी मला फसवले आहे, हे त्यांना माहीत आहे. व्यावसायिकतेचे यापेक्षा मोठे उदाहरण असूच शकत नाही,’ असे शहा म्हणाले.
जुनागडच्या विकासासाठी नानावटी यांनी केलेल्या कार्याला उजळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नानावटी यांच्या जीवनाचे स्मरण करणाऱ्या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.