मुंबई पोलिसांकडून शहरासह उपनगरात शुक्रवारी ११ ते शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशन ऑल आउट दरम्यान तब्बल आठ फरार आरोपींना अटक करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई पोलिसांनी ही कारवाई १ आणि २ डिसेंबरच्या मध्यरात्री केली. या कारवाईत अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपआयुक्त, विभागीय सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह प्रमुख पोलीस अधिकारी या मोठ्या प्रयत्नात सहभागी झाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आणि सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांचे विशेष ‘ ऑल आऊट ऑपरेशन ‘ शहरात राबविण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या अखत्यारीतील परिमंडळ आणि वाहतूक पोलिस या मोहिमेचा भाग होते ज्यात अनेक गुन्हेगारांना पकडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.ऑपरेशन दरम्यान, एक महत्त्वपूर्ण कोम्बिंग प्रयत्न केले गेले, परिणामी १९९५ पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८१ व्यक्ती विविध गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८७ जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
हे ही वाचा:
मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!
मुंबई वाहतूक विभागाकडून २५० कोटी रुपये दंडाची वसुली!
भाजपाची राजस्थानात मुसंडी, मध्य प्रदेशातही संपूर्ण बहुमताकडे
आरिफ बनला वीर… हिंदू मुलीवर बलात्कार, धर्मांतर, गर्भपात
याव्यतिरिक्त, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत तब्बल सहा ड्रग्जचे प्रकरणे समोर आली आहे.बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या लक्ष केंद्रित करून ३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहरातील २२ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून ४३ संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर शहरात राहणाऱ्याना रोखण्यासाठी पोलिसांनी हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखानासह आस्थापनांचीही तपासणी केली.
महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२० आणि १२२ चे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या ११९ व्यक्तींची ओळख पटवून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.याशिवाय शहरातील २८१ अवैध फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी शहरातील १०८ ठिकाणी नाकाबंदी केली, संघटित नाकाबंदी दरम्यान तब्बल ७७३८ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. शिवाय, मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यांतर्गत ६० वाहनचालकांना दंड करण्यात आला.