लव्ह जिहादच्या घटना या आता भारतात नित्यनियमाच्या बनल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या फरिदाबादमध्ये मूळ नाव आरिफ असलेल्या एका मुस्लिम युवकाने वीर हे नाव धारण करत हिंदू मुलीचे लैंगिक शोषण केलेच पण जबरदस्तीने धर्मांतरण केले, नंतर तिला गर्भपातही करावे लागले.
आरिफ नावाच्या या मुस्लिम युवकाने या पीडितेला जाळ्यात ओढले. ती पीडिता अल्पवयीन असताना या युवकाने तिला भुलवले आणि नंतर ती वयात आल्यावर तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले तसेच तिच्याशी निकाह केला. त्या मुलीवर नंतर त्याचा भाऊ आणि वडिलांकडून बलात्कारही करण्यात आला.
या मुलीने नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यात तिने आरोपी आरिफ आणि त्याच्या कुटुंबियांनी कसे लैंगिक शोषण केले त्याची माहिती दिली. तिने म्हटले आहे की, ती अल्पवयीन असतानाच तिचे आरिफसोबत प्रेमसंबंध तयार झाले. त्यानंतर आरिफने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे चित्रणही केले. ते चित्रण व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत राहिला.
हे ही वाचा:
पाकिस्तानातील सिंधींकडून रामलल्लासाठी पोशाख
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांची चुपी; स्पष्टीकरण टाळले
मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद
महिलेलाही बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते?
यादरम्यान अनेकवेळा तिचा गर्भपात करण्यात आला. आरिफ, त्याचा भाऊ आणि त्याचे वडील यांनी त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीची हत्या केल्याचाही आरोप या पीडितेने केला आहे. त्यानंतर तिला मनाली येथे नेऊन तिला उंच ठिकाणाहून ढकलून देण्याचाही कट करण्यात आला होता. त्या दरम्यान पीडितेने आपल्या घरच्यांशी संपर्क साधला आणि तिने घडलेले सारे सांगितले. या पीडितेने म्हटले आहे की, आरिफविरोधात आणखीही काही गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
पोलिसांनी आता याची सखोल चौकशी सुरू केली आहे. धर्मांतर, बलात्कार, सामुहिक बलात्कार असे गुन्हे नोंदविण्यात आले असून पीडितेच्या तक्रारीत तर १४ जणांची नावे आरोपी म्हणून घेण्यात आली आहेत.