मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये काका शिवपालसिंह यादव आणि पुतण्या अखिलेश यादव यांच्यावर नर्मविनोदी शैलीत टीका केली. काकाने चुकीचा रस्ता दाखवला म्हणून आता त्याचे फळ भोगावे लागत आहे. बाभळीचे झाड लावले तर आंब्याचे झाड कुठून येणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
योगी यांनी राज्यातील रस्त्यांबाबतच्या चर्चेबाबत बोलताना शिवपाल सिंह हेदेखील चांगल्या रस्त्यांसाठी धन्यवाद देत असल्याचे सांगतिले. काका म्हणतात की तेही चांगले काम करू इच्छित होते. मात्र त्यांना पाठिंबा मिळाला नाही. मुख्यमंत्री योगी यांनी अशा शैलीत हे सांगितले की, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हसू लागले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागासवर्यीय, दलित आणि अल्पसंख्याक यांच्या मुद्द्यावरही विधानसभेत चर्चा केली. समाजवादी पक्षाने जातींच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. सरकारमध्ये असतानाही त्यांना मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याकांचा विसर पडला होता. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
रिंकूनंतर अक्षरची कमाल; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका जिंकली
मुंबई महापालिकेतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार
महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
जातीच्या नावावर उत्तर प्रदेशात घराणेशाही आणि अराजकता निर्माण करणाऱ्यांचे कारनामे लोकांपासून लपून राहिलेले नाहीत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा सांगितले होते. माणूस ना उच्च असतो ना नीच. ना मोठा असतो, ना छोटा. माणूस केवळ माणूस असतो. जर याची जाणीव तुम्हाला असती तर तुम्ही विरोधी बाकांवर बसला नसतात, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केली.