छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला दिल्लीपर्यंत पोहोचवणारा अजिंक्य योद्धा, ईश्वरदत्त सेनापती राऊ अर्थात पहिले बाजीराव पेशवे! कथा, कादंबऱ्या आणि सिनेमांनी या देदीप्यमान योध्याला फक्त मस्तानीतच अडकवून ठेवलं. इतिहास या योध्याकडे कसा पाहतो? त्याच्यानंतरचे इतिहासकार, इतर सेनापती काय म्हणतात? याचा सद्यंत धांडोळा घेतला आहे कौस्तुभ कस्तुरे यांनी त्यांच्या शहामतपनाह बाजीराव पुस्तकात!
सध्या वाचतोय…उत्तम पुस्तक आहे….