भारतातील लष्कर आणि संरक्षण उत्पादनाला मोठी चालना देण्यासाठी ९७ अतिरिक्त विमाने आणि १५० प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास संरक्षण खरेदी मंडळाने मान्यता दिली आहे.
दोन्ही विमाने स्वदेशी विकसित आहेत आणि या खरेदीची किंमत १.१ लाख कोटी रुपये इतकी आहे.भारतीय हवाई दलासाठी तेजस मार्क १-ए लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत तसेच हवाई दलासह भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर खरेदी केले जात आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेने आणखी काही व्यवहाराला मंजुरी दिली आहे, याचे एकूण मूल्य २ लाख कोटी रुपये इतकी आहे.या व्यवहाराला मंजुरी मिळाल्याने, भारताच्या इतिहासातील स्वदेशी उत्पादकांसाठी ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
हे ही वाचा:
प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा!
इस्रायल-हमास युद्धविरामत एक दिवसीय वाढ!
‘भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण’
बंधुभावानेच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद टिकवला
भारतीय हवाईदलाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या तेजस विमांनाची संख्या आता १८० वर पोहचेल.फेब्रुवारी २०२१ मध्ये संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस एमके-१ए विमाने खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी सोबत ४८,००० कोटी रुपयांचा करार केला होता.तसेच भारत सरकार अंदाजे ४०,००० कोटी रुपये खर्च करून दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका तयार करण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यास तयार आहे.हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या कारवायांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाची प्रमुख संस्था डिफेन्स प्रोक्युरमेंट बोर्ड (डीपीबी) ने या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली आहे, ज्यामुळे सरकारची दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएसी-२’ या नावाने ओळखली जाईल.