वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जर राज्यात दंगली होऊ शकतात असे बोलत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे असे विधान केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.मंत्री नारायण राणे यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली तेव्हा ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणतात राज्यात दंगली होतील.तशी त्यांनी तारीखही दिली आहे.प्रकाश आंबेडकर म्हणतात, राज्यात तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत दंगली होतील. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. तसा पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे का? असेही आंबेडकरांना विचारण्यात आले.
हे ही वाचा:
टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले
फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!
मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!
पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?
यावर नारायण राणे म्हणाले की, त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे.अशी माहिती जर कोणी लपवत असेल तर तो क्राईम होतो.त्यांना अटक करून त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे की कोणत्या आधारावर तुम्ही राज्यात दंगली घडतील असे बोलत आहात.राजकीय दृष्ट्या संपलेले लोक असे ला बोलतात? त्यांनी आता घरी बसलं पहिजे, असा टोमणा नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.
प्रकाश आंबेडकरांना अटक करा असे तुमचे म्हणणे आहे का? असा प्रश्न राणे याना विचारण्यात आला तेव्हा नारायणे राणे म्हणाले, मी असे कुठे म्हणालो त्यांना अटक करा, क्राईम झाला असेल तर त्यांना अटक करा, असे नारायणे राणे म्हणाले.ते पुढे म्हणाले, राज्यात दंगली होतील असे जे कोणी वक्तव्य करत असतील,ते म्हणजे प्रकाश आंबेडकर असो अथवा कोणीही असो त्याची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे.