प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा सांगलीत पार पडली.या सभेची सुरुवात प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घालून केली.टिपू सुलतानच्या फोटोला हार घातलात तर बघा असे काहींनी सांगितले होते.पण पोलिस खात्याला आवाहन आहे पाच वर्षानंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलते.आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. पण आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रकाश आंबेडकर सभेत म्हणाले.
राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाज आंदोलन, उपोषण करत आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात जाती जातीत तेढ निर्माण होत असल्याचे दिसत आहे.तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर पार पडली.
हे ही वाचा:
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री, नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे निधन
पहिल्यांदाचं एनडीएच्या दीक्षांत संचलनात महिलांच्या बटालियनचे संचलन
निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा डीपफेक व्हिडीओ बनवून ज्येष्ठ नागरिकाला धमकी!
‘अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्धी असणे हे भारताचे दुर्भाग्य’
प्रकाश आंबेडकर सभेत म्हणाले की, टिपू सुलतानच्या फोटोला हार घातलात तर बघा असे काहींनी आदेश दिले होते.पण पोलिस खात्याला आव्हान आहे ; पाच वर्षातनंतर निवडणूका येतात आणि सरकार बदलते. आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्यचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही, मात्र आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार उद्याची सत्ता आपल्याला बदलायची आहे असे आंबेडकर यांनी म्हणत त्यांनी विरोध करणाऱ्यांना आव्हान दिले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी औरंगजेबाच्या स्टेटसवरुन पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील वातावरण बिघडलं. मग कोल्हापुरात परत टिपू सुल्तानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव वाढला.तसेच प्रकाश आंबेडकर माघील काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन नतमस्तक होत हार-फुले वाहिली होती.त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते.मात्र, आता प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घातल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.