27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषबोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी देवदूत बनलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० हजारांचा भत्ता

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी देवदूत बनलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० हजारांचा भत्ता

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा

Google News Follow

Related

उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ ४१ कामगार अडकून पडले होते. या अडकलेल्या ४१ कामगारांना मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास सुखरुप बाहेर काढण्यात आलं. गेल्या १७ दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व पातळीवर अथक प्रयत्न केले जात होते. दिवसरात्र हे बचावकार्य सुरू होते. या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी म्हणून अनेक हात २४ तास झटत होते.

या पार्श्वभूमीवर बचावकार्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ५० हजार प्रोत्साहन भत्त्याची घोषणा केली आहे.

एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, केंद्रीय एजेन्सी आणि इतर काही संस्थांच्या लोकांनी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ४०० तासानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बोगद्यातून बाहेर पडता आले आहे.

१२ नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी रोजी सिल्क्यारा बोगद्यात काम करत असताना काही भाग कोसळला. त्यामुळे आतमध्ये काम करणारे ४१ मजूर आतमध्ये अडकून पडले. त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले. अमेरिकेकडून मागवण्यात आलेल्या ऑगर मशिनच्या साहाय्याने सुरुवातील खोदकाम सुरु करण्यात आले होते. पण, या मशिनमध्ये अनेकदा बिघाड झाला होता. त्यामुळे अडथळे येत होते.

हे ही वाचा:

४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार

सरकारने ७० लाख मोबाईल नंबर केले रद्द!

‘शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख असे पदच नाही’

‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!

अखेर रॅट होल मायनिंगच्या पद्धतीने खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मध्य प्रदेशातून १२ जणांचे पथक दाखल झाले होते. अखेर त्यांना यश मिळाले. ४१ कामगारांना एक-एक करुन बाहेर काढण्यात आले. त्यामुळे देशभरात समाधान व्यक्त केले गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा