27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषमुंबई पोलिसांच्या 'लिओ' श्वानाने अपहरण झालेल्या मुलाला काढले शोधून!

मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने अपहरण झालेल्या मुलाला काढले शोधून!

९० मिनिटात 'लिओ'ने दाखविली आपली कामगिरी

Google News Follow

Related

प्रशिक्षित पोलिस स्निफर डॉगमुळे अपहरण झालेल्या सहा वर्षीय मुलाचा शोध लागला.अपहरण झालेल्या मुलाच्या पालकांनी गुरुवारी मध्यरात्री पवई पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर साडेतीन तासात मुलाची सुटका करण्यात आली.

विवेक कोरी असे सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे.अपहरणकर्त्याने मुलाच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर अंधेरी (पूर्व) येथील अशोक नगर झोपडपट्टीत सोडून दिले.झोपडपट्टी भागात भटके कुत्रे सतत भुंकत असल्याचे दिसल्याने मुलाला शोधण्याचे काम ‘लिओकडे सोपवण्यात आले आणि तो यशस्वी झाला.मुलाचा माग काढत लिओने ९० मिनिटात शोधून काढले.

पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पवई पोलिसांनी सांगितले की, मुलगा शेजारच्या मोकळ्या मैदानात सापडला होता. रात्री आठच्या सुमारास हा मुलगा झोपडीबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. रात्री जेवण करून तो घरी न परतल्याने त्याचे आई-वडील आणि ११ वर्षांच्या बहिणीने त्याचा शोध सुरू केला.

हे ही वाचा:

सरकारने ७० लाख मोबाईल नंबर केले रद्द!

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

भारत गौरव ट्रेनमधील ८० प्रवाशांना झाली अन्न विषबाधा!

नौदल दिनासाठी आयएनएस ब्रह्मपुत्रा तारकर्लीजवळच्या समुद्रात दाखल

झोपडपट्टी असल्याने भागात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते,म्हणून आम्ही बॉम्ब शोधक आणि शोध पथकाच्या (बीडीडीएस) स्निफर डॉगची मदत घेण्याचे ठरवले.’लिओने’ त्या मुलाकडे नेले, मुलगा घाबरला असल्याने तो काहीही सांगू शकला नाही, असे पवई पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेची गंभीर दखल घेत डीसीपी (झोन एक्स ) दत्ता नलावडे यांनी एसीपी भरत सूर्यवंशी, निरीक्षक सुप्रिया पाटील, निरीक्षक विजय दळवी, सहायक निरीक्षक विनोद लाड, उपनिरीक्षक नितीन गायकवाड आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करून अनेक पथके तयार केली. एक टीम मुलाच्या बहिणीसोबत शोधण्याचे काम करू लागली तर दुसरी टीम मुलाच्या शोधात तैनात करण्यात आली.

बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पीडितेच्या पालकांनी शुक्रवारी पहाटे १२.३० च्या सुमारास पोलिसांकडे धाव घेतली. मुलाचा शोध घेण्यासाठी आम्ही त्याच्या बहिणीची मदत घेतली.तिने आम्हाला सांगितले की, मुलगा घरातून बाहेर पडण्यापूर्वी कपडे बदलले होते.आम्ही लगेच प्रशिक्षित पोलिस कुत्र्याची (लिओ) सेवा घेण्याचे ठरवले. अपहरण झालेल्या मुलाच्या टी-शर्टचा वास लिओला देण्यात आला.लिओने त्वरित मुलाचा माग काढत ९० मिनिटात शोधून काढले, असे अधिकारी म्हणाले.पोलीस अधिकारी व्ही नारायण यांनी सांगितले की, मुलाचा ताबा मिळवल्यानंतर अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले, परंतु मुलगा भयभीत झाल्याने त्याने जास्त काही सांगितलं नाही.तो फक्त एवढाच म्हणाल की, मला एका काकांनी नेले होते, असे अधिकारी म्हणाले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा