इस्रायलने पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तैबा या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली होती. याची आठवण करून देत भारत लवकरच हमास या दहशतवादी संघटनेला प्रतिबंधित म्हणून जाहीर करेल, अशी आशा इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी व्यक्त केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासच्या दहशतवादी कारवायांबाबतची माहिती याआधीत भारत सरकारकडे सामायिक केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचे भारतातर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र गाझा पट्टीमध्ये वर्चस्व असलेल्या हमास संघटनेला भारताने प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर केलेले नाही. हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्यासंदर्भात भारताने इस्रायल सरकारला काही संकेत दिले आहेत का?, अशी विचारणा करण्यात आली असता ‘आम्ही आमच्या परीने जे काही अपेक्षित होते, ते केले आहे. आता ते किती जलदगतीने करायचे आणि कशाप्रकारे करायचे, याचा निर्णय भारत सरकारला घ्यावयाचा आहे,’ असे गिलॉन यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उत्साहात
ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!
समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!
अरब देशांच्या राजदूतांनी पॅलिस्टिनी नागरिकांप्रति ऐक्यभाव दाखवण्यासाठी पॅलेस्टाइन दूतावासाला भेट दिल्यानंतर गिलॉन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.इस्रायलच्या संरक्षण दलाने उत्तर गाझामधील हमासचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. मात्र भुयारांतील त्यांचे तळ अद्याप शाबूत आहेत. सध्याचा युद्धविरामाचा कालावधी संपल्यानंतर कदाचित पुन्हा दक्षिण गाझामध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील चार दिवसांच्या युद्धविरामाची मुदत संपली असली तरी ती पुन्हा दिवसांसाठी वाढवण्यात आली होती. हमासचे सुमारे ३० हजार दहशतवादी असून त्यातील हजारो इस्रायलच्या मोहिमांमध्ये मारले गेल्याचे गिलॉन यांनी सांगितले. हमासचे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा पण इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांना केल्याचे त्यांनी सांगितले. युद्धविरामाचा कालावधी संपल्यानंतर गाझावर पुन्हा हल्ले केले जातील, असे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.