पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारुती नवले यांच्यावर पुणे पोलीस ठाण्यात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले यांच्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफसाठी म्हणून कमी करण्यात आलेली रक्कम त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नवले यांच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून २०१९ ते २०२२ पर्यंत पीएफ भरण्यासाठी म्हणून लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे उद्घाटन उत्साहात
ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!
समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!
मारुती नवले यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असून, कोंढव्यात त्यांची सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. दरम्यान, या शाळेत नोकरी करत असलेल्या १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून २०१९ ते २०२२ पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांचे तब्बल ७४ लाख रुपये मारुती नवले यांनी पगारातून कपात केले होते, परंतु, कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पीएफ घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात मारुती नवले याच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.