कुख्यात गुंड आणि बहुजन समाज पक्षाचा आमदार मुख्तार अन्सारी याला पंजाबच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशला आणण्यासाठी युपी पोलिसांची एक विशेष टीम सोमवारी रवाना झाली आहे. मुख्तार अन्सारीला २०१९ सालच्या एका खंडणी वसूल करण्याच्या केसमध्ये पंजाबमधील जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या केसमुळे जानेवारी २०१९ सालापासून मुख्तार अन्सारी पंजाबमधील जेलमध्ये आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश पंजाब सरकारला दिले. मुख्तार अन्सारीने उत्तर प्रदेशमध्ये स्वतःसाठी बनवलेली बुलेटप्रूफ ऍम्ब्युलन्स युपी पोलिसांच्या ताब्यात आली आहे.
हे ही वाचा:
दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री?
अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा?
या ऍम्ब्युलंसचे सर्व कागदपत्र बनावट असल्याची माहिती युपी पोलिसांनी दिली आहे. याच केस संदर्भात चौकशीसाठी युपी पोलिसांनी पंजाब सरकारकडे मुख्तार अन्सारीची कस्टडी मागितली होती. परंतु अनेक महिने पंजाब सरकारने ही कस्टडी देण्यास नकार दिला. शेवटी २६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्याने पंजाब सरकारला मुख्तार अन्सारीचा ताबा युपी पोलिसांना द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालायने पंजाब सरकारला ८ एप्रिल पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे सोमवारी (५ मार्च) युपी पोलिसांची विशेष टीम पंजाबच्या दिशेने रवाना झाली आहे.